बिरसा ब्रिगेडच्या सतर्कतेमुळे सहा वर्षाच्या मुलीची सव्वा महिन्यानंतर सुटका आदिवासी लोकांसोबत करार करून कामासाठी आणुन बंधक बनवुन शेतावर ठेवल जात होत होत.
महाराष्ट्र ,चोपडा तालुक्यातील अस्तर देवसिंग पावरा* हा आदिवासी बांधव सहकुटुंब भिगवण ता. इंदापुर जिल्हा पुणे येथिल *सुहास भाकरे* यांच्या कडे कामाला आला आणि ठरल्या प्रमाणे मिळालेल्या पैशाचे काम देखील केले नंतर जास्त दिवस होऊन मालक पैसे देईना मग दुसरीकडे काम बघितले तर ह्या सुहास भाकरे ने अस्तर पावराची सहा वर्षाची मुलगी कु.अनिता हीला तीच्या वडीलाकडुन सव्वा महिने झाले पळवुन आणली यांची मजल एवढी की पुन्हा अस्तर पावराला फोनवर धमकी व शिवीगाळ करत होता….
हिच्या पालकांनी खुप गया वया करून देखील मुलीला तो देण्यास तयार नाही व मारण्याच्या जीवे मारण्याच्या भितीने तीचे वडील सुहास कडे जाईनात सगळीकडे फिरून व विनंवण्या केल्या पण कोणीच मदत करत नव्हत शेवटी बिरसा ब्रिगेडच्या कार्यकत्यांना हे कळवण्यात आले ….
अशा मानसिकतेच्या लोकांना कोन सुसंस्कृत म्हणवणार यांच्या अशा वागण्याने दोन समाजात दुही निर्माण होते सामुहिक वाद निर्माण होतात…अशा लोकांवर पोस्को ,अँस्ट्रोसिटी अंतर्गत कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे …
हे प्रकरण बिरसा ब्रिगेड,सह्याद्री* च्या कार्यकत्यांना कळल मग काय त्वरीत यांच्या मुसक्या आवळल्या आणि त्या मुलीची सुटका केली ती मुलगी आता तीच्या वडीलांच्या म्हणजे अस्तर भिमसिंग पावरा कडे सुपुर्द करण्यात आली आहे….. या घटनेबाबत महाराष्ट्रातील स्वतःला सुशिक्षित व सुज्ञ नागरिक म्हणून घेणारे चकार शब्द ही काढणार नाहीत….पत्रकार ,लेखक , युटुबर आणि व्हाँट्स अँप पोपट पंची तर लय लाबची गोष्ट …..