बोगसांविरोधात ‘आदिवासी एकवटले २१ आदिवासी संघटनांचे मोर्चात सहभागी.

जनआक्रोश मोर्चात सहभागी झालेले राज्यभरातील २१ आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व आदिवासी लोकप्रतिनिधी,

बोगसांविरोधात ‘आदिवासी एकवटले

 राज्यामध्ये असलेल्या आरक्षणाचा अनुसूचित जमातीत नसलेल्या व्यक्ती घेत आहेत. याविरोधात जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी मोर्चा काढून  निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात राज्यभरातील हजारो आदिवासी सहभागी झाले होते.

यावेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार जिवा पांडू गावित, माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी. माजी जि.प. अध्यक्षा अॅड. सीमा वळवी, ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे, सदानंद गावित, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचचे जयसिंग माळी, आदिवासी टायगर सेनेचे अजय गावित, अरविंद वळवी, मालती वळवी, नामदेव पटले यांच्यासह देश आणि राज्यातील २१ आदिवासी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महाराणा प्रताप पुतळा चौकापासून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चात महिला आणि पुरुषांसह युवकांचा मोठा सहभाग होता.


सदनात २४ आदिवासी आमदार आहेत. आदिवासींचे आरक्षण बदलू पाहणाऱ्या सरकारविरोधात या आमदारांनी सभात्याग केल्यास त्याची दखल घ्यावी लागते. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून निर्णय घेतात. अशा सरकारकडून अपेक्षा करण्यापेक्षा रस्त्यावरची लढाई सुरू ठेवून एकत्र यावे लागेल. – विनोद निकोले, आमदार, डहाणू विधानसभा मतदारसंघ

आदिवासींसाठी जन आक्रोश मोर्चा; २१ संघटनांचा सहभाग, हजारोंची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक या संघटनांचा होता सहभाग.

  • आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच,
  • आदिवासी महासंघ,
  • आदिवासी एकता परिषद,
  • महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर असोसिएशन,
  • महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, 
  • आदिवासी राजपत्रित अधिकारी महासंघ,
  • आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान,
  • ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन,
  • आदिवासी क्रांतिदल,
  • आदिवासी सरपंच/पोलिस पाटील संघटना,
  • जिल्हा समन्वय समिती,
  • आदिवासी ग्रामसेवक /तलाठी संघटना,
  • आदिवासी पावरा उन्नती मंडळ,
  • आदिवासी शिक्षक संघटना,
  • आदिवासी बिरसा फायटर्स,
  • अखिल भारतीय पावरा / बारेला संघटना शहादा, आदिवासी टायगर सेना,
  • देवमोगरा देवी मित्र मंडळ, 
  • आदिवासी एकलव्य युवा संघटना, 
  • आदिवासी रूढी परंपरा व जागृती संस्था, आदिवासी वकील संघटना,
  • आदिवासी बिग्रेड,
  • भिलीस्थान टायगर सेना,
  • आदिवासी बिरसा फायटर्स,
  • अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,
  • आदिवासी हक्क संरक्षण समिती.

मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले असल्याने पोलिस प्रशासने चोख बंदोबस्त ठेवला होता. महाराणा प्रताप यांचा पुतळ्याजवळ याहामोगी माता व क्रांतिकारकांना अभिवादन हा मोर्चा मार्गस्थ झाला होता. साक्री नाक्यावर आल्यावर मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले.

यावेळी सरकारी सेवेतील जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले कर्मचारी व जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या१२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देणारा १४ डिसेंबर २०२२चा शासन निर्णय रद्द करावा व धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये, १२ हजार ५०० बोगस कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवेतून बडतर्फ करावे, खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !