भाडे वाढसाठी टॅक्सी संघटनांचा १ ऑगस्टपासून बेमुदत संप |
भाडे वाढसाठी टॅक्सी संघटनांचा १ ऑगस्टपासून बेमुदत संप.
ठाणे (प्रतिनिधी ) : प्रलंबित भाडे दरवाढ, परवाने वाटप बंद करा, रिक्षा टॅक्सी व्यवसायिकांकरीता महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य झाल्या नाही.
तर कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या संपात ठाणे, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख रिक्षा चालक सहभागी होणार आहेत. या संपामुळे प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
इंधनाचे दर वाढले आहेत. परंतु रिक्षा भाडेदरात वाढ झालेली नाही. राज्य सरकार मागेल त्यास परवाना देत आहे.त्याचा परिणाम रिक्षा वाढल्या असून पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
त्यामुळे परवाना वाटप बंद करावे. ई चलानद्वारे पोलीस प्रशासनाने सुरू केलेली कारवाई अशा विविध मागण्या महासंघाच्या आहेत.
या मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने दिला आहे. या संपात अडीच लाख रिक्षा चालक सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाने दिली.