मकर संक्रांत अति महत्वाची माहिती जाणून घ्या..

मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड गोड बोला !!! 

अविनाश देशमुख शेवगांव }

१५/१/२३ रविवारी पुजेला जाण्यासाठी शुभमुहुर्त सूर्योदय पासून सूर्यास्त पर्यत आहे.त्यादिवशी देवीने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे . त्यामुळे पूजेला जातांना पिवळे रंग वापरू नये* उदा.पिवळे वस्त्र पिवळे फूल पिवळ्या बांगड्या घालू नये पिवळे दागिने सुद्धा घालू नये.वयाने कुमारी असून बसलेली आहे .


लहान मुलींवर संक्रात आहे. त्यामुळे घरातील लहान मुली कुमारिका मुली यांची जास्त काळजी घ्यावी.* यांना रागवू नये त्यांचे लाड, हट्ट पुरवावे. वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे त्यामुळे सर्व जाईल जाईल असे होईल. खर्च वाढेल सेव्हिंग्ज जपून जपून वापरावे.. *पूजेला जाताना पांढऱ्या फुलांचा गजरा लावू नये. वार नाव राक्षसी असून नक्षत्र नाव मंदाकिनु आहे .

ज्या महिलांचे नाव र आणि म पासून सुरुवात होते त्या महिलांवर मुलींवर संक्रांत आहे त्यांनी थोडे अधिक शरीराची प्रकृतीची स्वास्थ्याची काळजी घ्यावी.* दक्षिणेकडून येत आहे व उत्तरे कडे जात असून नैऋत्येकडे पहात आहे .

त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी जेवायला बसताना किंवा झोपताना दक्षिण-उत्तर पाय व तोंड करून झोपू नये जेवण करू नये संक्रांति ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील घराचे दिशा असणाऱ्या लोकांना सुख प्राप्त होते संक्रांति काळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते .

संक्रात महिन्यात सोने,चांदी महाग होणार आहे.बाजारात तेजी दिसेल…भरभरून खरेदी विक्री होईल. गृहपयोगी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्री होतील.चैनीच्या वस्तू महाग होतील. साखर स्वस्त होईल…

संक्रांति पर्व काळात स्त्रीयांनी दान करावे ब्राह्मणांचे पूजन करून दान द्यावे व दक्षिणा द्यावी

संक्रांतीचा पर्वकाळ १५ जानेवारी रविवार वार सूर्योदय पासूनसूर्यास्तापर्यंत आहे .*पूजेला जातांना या दिवशी तिळाचे उटणे अंगास लावणे , तिलमिश्रित उदकाने स्नान , तिलहोम , तिलतर्पण , तिलभक्षण , तिलदान केले असता सर्व पापांचा नाश होतो .

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !