सिंचन विहिरी साठी मिळणार चार लाख.
तालुका प्रतिनिधी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीच्या अनुदानात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. यात सिंचन विहिरीसाठी तीन लाखाची आता चार लाख अनुदान दिले जाणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी या सूचना जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सिंचन विहिरीच्या कामाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Four lakhs will be given for irrigation wells. |
रोजगार हमी योजना विभागाच्या सूचना जाहीर.
रोजगार हमी योजना विभागातर्फे 4 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय यानुसार व मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आले आहेत त्यामुळे लाभार्थी शेतकरी आनंदी आहेत.
कोणाला मिळेल अनुदान.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटक्या जमाती विमुक्त जमाती दारिद्र्यरेषेखालील, महिलाकर्ता असलेली कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती यांना अनुदान मिळणार आहे.
अर्ज कसा आणि कोठे करायचा.
ग्रामपंचायतीच्या अर्ज अथवा ऑनलाईन अर्ज सादर करावा अर्जासोबत सातबारा उतारा 8अ चा ऑनलाईन उतारा जोडावा. किंवा आपल्या क्षेत्रातील रोजगार सेवकाला संबंधित माहिती विचारून अर्ज सादर करावा.
ग्रामसभा मान्यतेनंतर महिनाभरात मंजूर.
मनरेगाच्या कार्यपद्धती प्रमाणे कोणाला व किती लाभ घेता येईल याचा निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे..
ग्रामसभेत बंदी असेल तर ग्रामपंचायतीच्या समिती एका महिन्यात मान्यता देण्यात सूचना आहे.
अनुदान वाढल्याने कामाची गती वाढेल.
सिंचन विहिरीसाठी निधीत वाढ झाल्याने कामाला गती मिळेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे मात्र त्या निधी वेळेवर मिळणे गरजेचे असल्याने सांगितले जात आहे.
सिंचन विहिरी योजनेअनुदान वाढवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे विहिरी अनुदान योजनेच्या लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा भूजल सर्वेक्षण यंत्र के कडून पाणी उपलब्धतेची प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.
शासन निर्णय वाचा .