मराठी व्याकरण पार्ट नं २ / Marathi Vyakaran No 2
वाक्याचे घटक वाक्याचे एकूण ३ घटक आहेत.
(१) कर्ता २) कर्म ३) क्रियापद
(१) कर्ता :- क्रिया करणाऱ्याला कर्ता असे म्हणतात. म्हणजे जो क्रिया करतो तो कर्ता. क्रियापदाला ‘कोण’ असा प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो. उदा. विनिता झोपली होती. वरील उदाहरणात ‘झोपली’ हे क्रियापद आहे. त्याला ‘कोण झोपली होती ?” असा प्रश्न विचारला की, विनिता हे उत्तर मिळते म्हणून विनिता ही कर्ता आहे.
२) कर्म :- क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर घडते, त्याला कर्म असे म्हणतात. उदा. दीपक गाणे म्हणतो. वरील उदाहरणात ‘दीपक’ हा कर्ता, ‘म्हणतो’ हे क्रियापद व म्हणण्याची क्रिया म्हणून ते कर्म आहे.
३) क्रियापद :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे दोन प्रकार आहेत.
- अकर्मक क्रियापद :- जेव्हा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते. तेव्हा त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदा. १) प्रशांत घराकडे पळत आला. २) त्याने दुकानदाराला पैसा दिला. ३) शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात.
- सकर्मक क्रियापद :- जेव्हा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठा कमांचा आवश्यकता असते. तेव्हा त्यास कर्मण क्रियापद असे म्हणतात .
Leave a Reply