मराठी व्याकरण भाग 3 शब्दांच्या जाती :
मराठी भाषेत शब्दांच्या आठ जाती आहेत. त्यांनाच विकारी व अविकारी शब्द असेही म्हणतात.
नाम
वाक्यात येणाऱ्या शब्दापैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना नाम असे म्हणतात. उदा. गोपाळ, हरी, फूल, माधव, गोडी, बापूराव, ठोकळा, कागद, देव, नरक, खरेपणा, औदार्य, इ.
नामाचे प्रकार :- नामाचे एकूण तीन प्रकार आहेत.
- सामान्य नाम – एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तुला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. उदा. मुलगा, आंबा, टेबल, ठोकळा, घर, शाळा, नदी, वनस्पती, इ.
- विषेश नाम – ज्या नामाने जातीचा बोध होत नसून एकाच निश्चित व्यक्तीचा, – प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदा. मिरज, कल्याणी, विनिता, कुणाल, भारत, गंगा, हिमालय, इ.
- भाववाचक नाम – ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या – गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो, त्यास धर्मवाचक किंवा भाववाचक नाम असे म्हणतात. उदा. शीर्य, औदार्य, गोड, दानशूर, पराक्रमी, इ.
सर्वनाम.
वाक्यात नामाएवजी जे शब्द येतात त्यांना सर्वनाम म्हणतात. उदा. हा ही है, तो, त्या ती, ती कोणी, कोणास इ.
सर्वनामाचे प्रकार :- सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत.
१) पुरुषवाचक सर्वनाम – बोलणारा, ज्याच्याशी आपण बोलतो, ज्याच्याविषयी बालतो किंवा लिहतो त्या व्यक्ती व वस्तू यांना व्याकरणात पुरुष म्हणतात. या वर्णातील नामांच्या बद्दल येणाऱ्या सर्वनामांचा पुरुषवाचक म्हणतात.
- १) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना सर्व नामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होय. उदा. मी, आम्ही, स्वतः, आपण, इ.
- २) द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम – ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करतांना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय. उदा. तू, तुम्ही, आपण, स्वतः, इ.
- 3) तृतीय पुरुषवाचक सर्वनाम – त्याच्याविषयी बोलायचे त्या वस्तू किंवा व्यक्ती यांचा उल्लेख करतांना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. तो, ती, ते, त्या, इ.
२) दर्शक सर्वनाम – जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्यासाठी जे सर्वनाम येते, त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदा. हा, ही, है, तो, ती, ते.
३) संबंधी सर्वनाम – वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदा. जो, जी, जे, ज्या.
४) प्रश्नार्थक सर्वनाम – ज्या सर्वनानांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो. त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. उदा. कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, कधी, कसे, इ.
५) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे – ज्यावेळेस कोणी, कोणास, काय हा सर्वनामे कोणत्या नामाबद्दल आली हे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात. उदा. १) कोणी कोणास हसू नये. २) त्या घरात काय आहे.
६) आत्मवाचक सर्वनाम – स्वतः बद्दल ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो, त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदा. १) मी स्वतः पाहिले २) तुम्ही स्वतः ला काय समजता ?
विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगून, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात
विशेषणाचे प्रकार :- विशेषणाचे एकूण तीन प्रकार आहेत.
१) गुण विशेषण २) संख्याविशेषण 3) सार्वनामिक विशेषण.
- १) गुणविशेषण – ज्या विशेषणामुळे नामाचा कोणत्याही प्रकारचा गुणविशेषण दाखविला जातो, त्यास गुण विशेषण असे म्हणतात. उदा. मोठी माणसं, आंबट चिंच, पिवळा आंबा, म्हातारी माणसं.
- २) संख्याविशेषण – ज्या विशेषणामुळे नामांची संख्या दाखविली जाते, त्यास संख्याविशेषण असे म्हणतात. उदा. चौपट फळे, दहा मुले, दहावी इयत्ता, पुष्कळ माणसे, काही मुली, इ.
- ३) सार्वनामिक विशेषण – सर्व नामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. उदा. तो आंबा, कोणते झाड, माझे गाव, असल्या झोपड्या, तिच्या बांगड्या,
क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार :- क्रियापदाचे एकूण सहा प्रकार आहेत.
१) सकर्मक क्रियापद २) अकर्मक क्रियापद ३) संयुक्त व सहायक क्रियापद ४) सिध्द व साधित क्रियापद (५) प्रयोजक क्रियापद ६) शक्य क्रियापद.
- १) सकर्मक क्रियापद – ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासते. त्यास सकर्मक क्रियापद म्हणतात. उदा. सुतार लाकूड तासतो. या वाक्याला पूर्ण अर्थ आहे. जर सुतार तास एवढे वाक्य दिले तर त्याचा अर्थ पूर्ण होत नाही येथे तासतो या क्रियापदाला लाकूड या कर्माची आवश्यकता आहे. म्हणून हे सकर्मक क्रियापद आहे.
- २) अकर्मक क्रियापद – ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण कर्माची आवश्यकता नसते, त्यास अकर्मक क्रियापद म्हणतात. उदा. आईने मुलीला पैसा दिला.
- ३) संयुक्त व सहाय्यक क्रियापद – ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास एखाद्या सहाय्यक क्रियापदाची आवश्यकता भासते, त्यास संयुक्त किंवा सहाय्यक क्रियापद असे म्हणतात. उदा. १) मैदानावर मुले खेळू लागली. २) आपणही आता खेळू. पहिल्या वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दाखविता पण तो व्याक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून तो धातुसाधिते आहे. वाक्यातील खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून ते क्रियापद. पहिल्या वाक्यात ‘खेळू लागली’ या दोन शब्दांनी क्रिया पूर्ण होते. फक्त ‘लागली’ या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. खेळू लागली या संयुक्त शब्दाने वा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे क्रियापदाचे रूप बनविण्यास सहाय्य केले म्हणून ते संयुक्त किंवा सहाय्यक क्रियापद होय.
- (४) सिध्द व साधित क्रियापद • नाम, विशेषण व अव्ययांपासून बनलेल्या क्रियापदांना सिध्द व साधित क्रियापद असे म्हणतात. उदा. १) तो शेवटी हॉटेलच्या व्यवसायात स्थिरावला. स्थिर या क्रियापदापासून स्थिरावला हे क्रियापद बनले. २) आईच्या आठवणीने तिचे डोळे पाणावले. ३) गावातील माणसे बरीच पुढारली.
- ५) प्रयोजक क्रियापद मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून ती क्रिया तो दुसऱ्या कोणाला तरी करावयास लावीत आहे, असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. उदा. १) बाळ हसते. २) आई त्या बाळाला हसविते. पहिल्या वाक्यात हसते हे क्रियापद आहे तर दुसऱ्या वाक्यात हसविते क्रियापद आहे या दोन्ही क्रियापदातील मूळ धातू हस हाच आहे. ३) ते मूल बसते. ४) त्या मुलाला आई बसविते. वरील वाक्यात बस ह्या धातू पासून बसविते हे क्रियापद.
- ६) शल्य क्रियापद : वाक्यात क्रिया करण्याची कर्त्याला शक्यता आहे, असा अर्थ व्यक्त होतो अशावेळी त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. उदा. १) मला हा डोंगर चढवतो.
क्रियापदांचे अर्थ :- क्रियापदांचे एकूण चार अर्थ आहेत.
१) स्वार्थ २) आज्ञार्थ 3) विध्यर्थ ४) संकेतार्थ
१) स्वार्थ – जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून काळाचा बोध होतो. व क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ तेव्हा समजतो, तेव्हा त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. (उदा. १) मुले अभ्यास करतात . २) सतीशने धडा वाचला. 3) मी बारावी पास होईल .
(२) आज्ञार्थ : जेव्आहा क्तारियापद रूपावरून आज्ञा करणे सल्ला देणे, विनंती करणे, उपदेश करणे, मागणे आशीर्वाद देण, प्रार्थना करणे इ. बोध होतो तेव्हा त्याला आज्ञार्थ क्रियापद असे म्हणतात उदा. १) देवा सर्वांना सुखी ठेव. (प्रार्थना) २) एवढे आमचे काम कराय (विनंती) ३) मुलांनो नेहमी खरे बोला. (आज्ञा) ४) परमेश्वर तुमचे भले करो. (आशीर्वाद)
३) विध्यर्थ : जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा विध्यर्थी क्रियापद असे म्हणतात. उदा. १) सुसंगती सदा घडो. २) मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. (शक्यता ) ३) कृपया उत्तर पाठवावे. (विनंती) ४) आता पाऊस थांबावा. (इच्छा)
४) संकेतार्थ : संकेत म्हणजे अट. जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजे अमुक केले असते तर अमुक्त झाले असते, असे समजते रह त्यास संकेतार्थी क्रियापद म्हणतात. उदा. १) निमंत्रण आले तर मी येईन. २) जर तू स्वतः आलास तरच मी तुला पुस्तके देईन. ३) मला निमंत्रण आले तर मी येईन.
क्रिया विशेषण अव्यय
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात, त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा. १) ती मुलगी जलद चालते. या वाक्यातील जलद हा शब्द चालतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो पण कर्त्याचे लिंग, वचन किंवा पुरुष बदलले तरी जलद या रूप आजारी पडता
शब्दयोगी अव्यय
शब्दाला जोडून येणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्ययात वर, बाहेर, मध्ये, खाली, साठी, आधी पासून मग नंतर, समोर, मागे, पूढे, इ. सारखे शब्द जोडून येतात. (उदा. १) पक्षी झाडावर बसला आहे. २) टेबलाखाली पुस्तक पडले. ३) सूर्य दगामागे लपला.
उभयान्वयी अव्यय
दोन शब्द किंवा अधिक शब्द अथवा दोन वाक्ये यांना जोडणाऱ्या अधिकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. यात आणि, व, वा, म्हणून, म्हणजे, किंवा, पण, परंतू, बाकी, इ. सारख्या शब्दांचा उपयोग करतात. उदा. १) पाऊस पडो वा ना पडो, मी आज गावाला जाईनच. २) तू जा किंवा न जा मी जाणारच. ३) विनिताने अभ्यास केला म्हणून तिला हे यश मिळाले.
केवलप्रयोगी अव्यय
आपल्या मनातील भावना विचार शब्दांच्या किंवा वाक्यांच्याद्वारे व्यक्त करतो व मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट होऊन एखादा उद्गार तोंडावाटे बाहेर पडतो. त्यास केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. उदा. १) अबब ! केवढा मोठा साप हा. २) बापरे ! धरण फुटले तर ३) अरेरे! फार वाईट गोष्ट झाली ही ४) शी! मला नाही आवडलं. ५) छान ! छान आवाज आहे तुझा !