महाराष्ट्रातील महागाई आणि अन्य समस्यांबाबत…मा. केजरीवाल सर यांना पत्र…

महाराष्ट्रातील महागाई आणि अन्य समस्यांबाबत...मा. केजरीवाल सर यांना पत्र...
आम आदमी पार्टी 

महाराष्ट्रातील महागाई आणि अन्य समस्यांबाबत…मा. केजरीवाल सर यांना पत्र… 

मा. केजरीवाल सर, मुख्यमंत्री, दिल्ली. आम आदमी पार्टी. ना. महोदय, 

आपण आम आदमी पार्टी च्या माध्यमातून दिल्ली मध्ये सरकार स्थापन केले. पंजाब मध्ये ही सरकार स्थापन झाले. आपण लोकांना विज, शासकीय दाखले, पाणी, आरोग्य सुविधा, महिलांना बस मोफत, अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत आहांत.

पंजाब चे मुख्यमंत्री सुद्धा याच सुविधा देत आहेत. या आपल्या सेवाभावी, स्वच्छ, भ्रष्टाचार मुक्त कारभारामुळे संपूर्ण देशात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण झाला आहे ! जे काम अन्य नेत्यांना भरपूर अनुभव असुनही जमले नाही. ते अद्भुत राजकीय कार्य आपण करून दाखवले आहे.

तसेच विविध जाती, जमातींनाच नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  

पण आमच्या महाराष्ट्रात शिक्षण आणि सर्व वातावरणाची उपलब्धता असूनही येथे इच्छा शक्तिचा अभाव आणि भ्रष्टाचारी व्यवस्था मुळे येथे शिक्षण संस्था असूनही महागडे असल्याने परवडत नाही. आरोग्य सेवा गरीब, सामान्य माणसाला मिळत नाही. विजेची बीले भरमसाठ वाढवली जात आहे. महागाई ने आसमान गाठले आहे. विरोधी पक्षांनी चुप्पी धोरण ठेवले आहे ! 

आता महाराष्ट्रातील जनता फक्त…. आणि फक्त…. आम आदमी पार्टी कडून अपेक्षा ठेवून आहे! शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, दलित, पिडीत, आदिवासी, भटके सर्व त्रस्त झाले आहेत.

आपण महाराष्ट्रात विशेष लक्ष घालावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र आम आदमी पार्टी प्रयत्न करीत आहेत. पण आपण खास लक्ष घातल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही.  

तरी आपण आमची विनंती मान्य करावी. व लोकांची महागाई च्या चक्रातून थोडी का होईना सुटका करावी. धन्यवाद. 

डॉ. दिलीप सुरवाडे ,माजी नगरसेवक प्रदेश सह सचिव, आम आदमी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा संयोजक, सामाजिक न्याय विभाग, जळगाव जिल्हा, जळगाव.

Next Page. Link

Preview Page. Link.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *