महाराष्ट्र च्या विद्युत ग्राहकांना विनंती मॅसेज वायरल.

सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत.

कारण,

4,5,6 जानेवारी 2023 ला.

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही.

महाराष्ट्र च्या विद्युत ग्राहकांना विनंती मॅसेज वायरल.


पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला खाजगी कंपनी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील.

पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा. BSNL बुडण्यापूर्वी JIO फुकटात, आजीवन सिम ,जास्त स्पीडचा भरपूर डेटा पॅक देत होतं ,आज कमी स्पीडचा डेटा पॅकला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत.

त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील , वसुलल्यामुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना.

वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे.

तर्फे

 *महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समिती, विज उद्योग, महाराष्ट्र

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !