महाराष्ट्र शासन निर्णय | गोर -गरीब / पेशंट/रुग्णांना आता मोफत बस प्रवास करता येणार.

पेशंट/रुग्णांना मोफत बस प्रवास, गोर-गरिबांना याची खूप आवश्यकता होती.

सिकलसेल, डायलेसिस, हिमोफेलिया रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने उपचार घेण्यासाठी राज्यात विनामूल्य प्रवास सवलत योजना लागू केली आहे. यासंदर्भातील निर्देश देणारे सुधारित परिपत्रक महामंडळाचे महाव्यवस्थापक यांनी राज्यातील सर्व वाहतूक विभाग नियंत्रकांना पाठविले आहे. 

राज्यातील सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलेसिस व हिमोफेलिया रुग्णांना विविध आरोग्य सेवा व उपचार घेण्यासाठी नियमितपणे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना नेहमी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करून जावे लागते.

 त्यामुळे त्यांचा प्रवास खर्च वाढतो. याचा विचार करून या रुग्णांना मदतीचा हात मिळावा म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या मार्फत मोफत प्रवासाची योजना त्यांच्यासाठी लागू केली आहे. 

शासनाच्या निर्णयाचे हार्दिक हार्दिक स्वागत..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *