अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा महासचिव पदी ॲड. दारासिंग पावरा यांची निवड.
नाशिक येथील एका हॉटेलमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची राज्यस्तरीय युवा कार्यकर्ता मेळावा नुकताच उत्साहात पार पडला. परिषदेचे लकि जाधव यांची राष्ट्रीय युवा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्राची युवा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.
या मेळाव्यात नुतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली असून, प्रदेशाध्यक्ष पदी इंजि. गणेश गवळी, राष्ट्रीय युवा महानिरीक्षक पदी निरज चव्हाण यांची फेरनियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य युवा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आकाश मडावी यांच्यावर तर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राम पथवे यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकि जाधव सह नवनिर्वाचित प्रदेश कार्याकारणी सत्कार आदिवासी समाजतर्फ मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.