महा ई सेवा केंद्र परवाना बाबत अर्ज कसा करावा.

महा ई सेवा केंद्र परवाना बाबत अर्ज कसा करावा.
महा ई सेवा केंद्र परवाना बाबत अर्ज कसा करावा.


महा ई-सेवा केंद्र परवाना कसा मिळेल? जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळवण्यासाठी सर्व कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. त्यानंतर महा-ई-सेवा केंद्र ( आपले सरकार सेवा केंद्र ) सुरू करण्यासाठी परवानगी त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो. त्यासाठी आवश्यक नोंदणी शुल्क व इतर प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागते.



महा ई सेवा केंद्र परवाना बाबत अर्ज नमुना 
प्रती,

मा.अध्यक्ष जिल्हा सेतू समिती
तथा जिल्हाधिकारी धुळे.
यांच्या सेवेची जिल्हा धुळे.
दिनांक :
विषयी महा-ई-सेवा केंद्र ( आपले सरकार सेवा केंद्र ) परवाना मिळण्याबाबत.

महोदय,

माननीय अध्यक्ष साहेब सो जिल्हा सेतू समिती जिल्हा धुळे, मी उपरोक्त विषयान्वये विनंतीपूर्वक आपणास अर्ज सादर करतो कि, मौजे न्यू बोराडी ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा ठराव क्रमांक…. दिनांक………….नुसार न्यू बोराडी गावामधील श्री………… हा व्यक्ती नवागाव न्यू बोराडी येथील रहिवासी असून त्याची शैक्षणिक पात्रता. बारावी पास कम्प्युटर सायन्स,BA ग्रॅज्युएशन, असे झाले असून, अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी सुशिक्षित व तरुण असून आर्थिक परिस्थिती बिकट आणि बेरोजगार आहे. तरी न्यू बोराडी ग्रामपंचायत मध्ये ( CSC केंद्र चालक ) महा-ई-सेवा केंद्र ( आपले सरकार सेवा केंद्र ) ची मंजुरी मिळून आयडी मिळावे. अशी मी आपणास पुनःच्छ विनंती करतो.

संबंधित लेख वाचा : महा ई सेवा केंद्र यादी मंजूर 

सदर व्यक्तीला महा-ई-सेवा केंद्राची ( आपले सरकार सेवा केंद्र ) मंजुरी देऊन आयडी मिळाल्यास मी आपला ऋणी राहील.


महा ई सेवा केंद्र काय काम करते?

महराष्ट्रात शाळा, कॉलेज, विविध शासकीय कार्यालयात शासकीय दाखले लागतात. त्या साठी राज्य महा ई सेवा केंद्र मार्फत विविध दाखले देण्याचे काम करते. आणि याचा वापर गावापासून ते शहरापर्यंत लोकं दाखले काढून आपले कामे करुन घेतात.

महाराष्ट्रात महा ई सेवा केंद्र कसे उघडायचे?

राज्यात महा-ई-सेवा केंद्र ( आपले सरकार सेवा केंद्र ) चालू करण्याचा विचार करत आहात, तर सर प्रथम तुमच्या कडे केंद्र सरकार ची CSC id चालू पाहिजे नंतर आपण आपल्या जिल्यात विनंती अर्ज करून महा ई सेवा केंद्र चालू करू शकता.

आपले सरकार सेवा केंद्र कसे सुरू करावे?

राज्यात online दुकाने जास्त चालू असून सध्या राज्य सरकारचे आपले सरकार सेवा केंद्र चालू करण्याचा विचार करत असतात. त्या साठी आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात विनंती अर्ज करा. आम्ही नमुना अर्ज देत आहोत, त्या प्रमाणे अर्ज करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !