मोटार वाहन निरीक्षकाला धमकी देणाऱ्यास अटक-दोन दिवसांची पोलिस कोठडी

मोटार वाहन निरीक्षकाला धमकी देणाऱ्यास अटक-दोन दिवसांची पोलिस कोठडी
मोटार वाहन निरीक्षकाला धमकी देणाऱ्यास अटक-दोन दिवसांची पोलिस कोठडी

शिरपूर : येथील मोटार वाहन निरीक्षकाला शिवीगाळसह मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देणारा कमलेश जयस्वाल (वय ४४) याच्या मुसक्या आवळण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणारा कमलेश जयस्वाल (वय ४४) हा गुन्हा दाखल होताच फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले होते, अशी माहिती सांगवी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली होती. 

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथील मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण हे हाडाखेड सीमा तपासणी नाकावर कर्तव्यावर होते. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दालनात कागदपत्रांची तपासणी करत होते.

सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमपी ०९ एचएच १८७३ क्रमांकाचा ट्रकमध्ये प्रमाणापेक्षा अधिक माल भरल्याचे स्पष्ट जाणवले. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्यामुळे या वाहनावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : पोलीस complaints कशी करावी 

कारवाई कशासाठी केली, असा जाब विचारत कमलेश जयस्वालसह एकाने शिवीगाळ केली होती. जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा नोंद होता. कमलेश याचा दारू विक्रीचा व्यवसाय असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा | पोलिसांना जीवे मारण्याची धमकी 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *