मोबाइल चोरीला गेलाय, मग तक्रार कशी करू ? दुर्लक्ष नको : तक्रार देणे ठरेल आपल्याच फायद्याचे चला तर सविस्तर जाणून घेऊया . संपूर्ण माहिती सह.
मोबाइल चोरीला गेलाय, मग तक्रार कशी करू ? दुर्लक्ष नको : |
पुणे : अलीकडे मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आपला मोबाइल चोरीला गेल्यानंतर नेमके काय करावे, हेच अनेकांना माहिती नसते. त्यामुळे काहीजण तक्रार द्यायची की नाही? हे मोबाइलच्या किमतीवर ठरवतात.
मोबाइलची किंमत अगदी किरकोळ असली तर तक्रार देत नाहीत आणि महागडा मोबाइल असेल तर तातडीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. तक्रार न दिल्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपला मोबाइल चोरीला गेल्यानंतर पहिल्यांदा पोलिस ठाण्यात जा; अन्यथा पोलिस ठाण्याच्या वेबसाइटवर जाऊन तक्रार नोंदवा. टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करू नका. तक्रार देणे आपल्या नक्कीच फायद्याचे ठरेल.
दिवाळीत दोन हजार मोबाइल चोरी; सापडले केवळ ५०
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या दिवाळीत पंधरा दिवसांमध्ये म्हणजेच १ ते १५ नोव्हेंबर या काळात मोबाइल चोरीच्या १ हजार ९४७ तक्रारी आल्या होत्या. त्यातील फक्त ५० मोबाइल रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले होते.
Related News : Police Complaint Link
मोबाइल चोरीला गेला, हे करा ऑनलाइन :
https://admin.punepolice.gov.in/LostFoundReg या पोर्टलवर जा. तेथे दिलेला सर्व तपशील व्यवस्थित भरा. त्यानंतर कॅप्चा टाकून “सबमिट” या बटणावर क्लिक करा.
पोलिस ठाणे
जेथे फोन हरवला किवा चोरीला गेला त्याच्या नजीकच्या पोलिस ठाण्यात जा. तेथे जागेचे नाव, जिल्हा, राज्य, मोबाइलचे नाव, आयएमइआय नंबर आणि फोन कधी हरवला, त्याची तारीख पोलिस ठाण्यात द्यावी लागेल. तुमचे नाव आणि पत्ता टाका. यानंतर आधार कार्डची प्रत जोडून एफआयआरवर सही करा. फोनची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कळवले जाईल.