या वर्षा पासून पुन्हा एकदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले.

या वर्षा पासून पुन्हा एकदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले
या वर्षा पासून पुन्हा एकदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले


दिनांक ०४/०८/२०२२ रोजी शासकीय आश्रशाळा व कॉलेज सवणे ता. तलासरी जि. पालघर  येथे या वर्षा पासून पुन्हा एकदा मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे त्याच्या उद्धघटनाचा कार्यक्रम झाला,  कार्यक्राप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून सवणे गावाचे उप सरपंच ठाकरे साहेब, शाळव्यावस्थपण समिती अध्यक्ष वाडिया साहेब, व्यावस्थापन सदस्य वाडिया सर, तसेच, आदिवासी एकता परिषद संस्कृतिक संमेलन अध्यक्ष पालघर चे,  आप. रान उराडे सर, आप.हितेन ईभाड , शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहिले होते.

शाळेच्या विध्यार्थीयांना मार्गदर्शन…

यावेळी  उपस्थित मुलींना, उपसरपंच साहेब, वाधीया सर यांनी मार्गदर्शन केले, शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेत निविन ११ वी विज्ञान शाखेची तुकडी ची सुरुवात झालेली आहे. त्याचे प्रवेश अजुन सुरू असल्याचे सांगितले, या ठिकाणी पहिली ते दहावी, व ११ वी १२ वी कला च्या दोन तुकड्या, तसेच सायन्स च्या दोन तुकड्या तुकड्यां चे असे एकूण ८०० च्या वर विद्यार्थी शिक्षण घेतील असे सांगितले.

जागतिक आदिवासी दिवसाचे महत्त्व...

या नंतर आप रान उराडे सर यांनी  ९ जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने उपस्थित शिक्षक,  शाळेतील विद्यार्थ्यांना, आपला आदिवासींचा अभिवादन शब्द जोहार बद्दल माहिती दिली,  जागतिक आदिवासी दिवसाचे महत्त्व ,जगात हा दिवस का साजरा केला जातो.

आदिवासी रूढी, प्रथा, परंपरा…

तसेच आदिवासी रूढी, प्रथा, परंपरा व या वर्षीच्या युनोच्या थीम प्रमाणे आपल्या आदिवासी समाजात  महिलांची भूमिका, व त्यांचे समाजासाठी असलेल योगदान काय आहे  हे सोयीनं बाई चे उदाहरण देवून  पटवून दिले तसेच स्वतंत्र लढ्यातील महिलां च योगदान काय होते.

महात्मा गांधी यांच्या सोबत केलेल्या कार्याची माहिती….

प्रकृती वासी आप दसरी बेन चौधरी यांच्या महात्मा गांधी यांच्या सोबत केलेल्या कार्याची माहिती दिली , व सेवटी यावर्षी पालघर येथे होणाऱ्या १ जिल्हा एक सांस्कृतिक महा रॅली बद्दल माहिती दिली, या वेळी शाळेतील शिक्षक चौरे सर यांनी आम्ही हि शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करूया असे सांगितले व उपस्थित पाहुण्याचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !