मा राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांचा दणका.
तालुका प्रतिनिधी – दिनांक 02/01/2020 रोजी ग्रामपंचायत गुरवली ता कल्याण जिल्हा ठाणे येथील ग्रामसेवक यांचे कडे ग्रामपंचायत ने केलेल्या विकास कामाचा आर्थीक लेखापरीक्षण अहवाल ची माहिती मागीतली होती परंतु त्यांनी माहिती अधिकार कायदा चे कलम 7/1 नुसार तिस दिवसात माहिती देणे बंधनकारक होते.
परंतु त्यांनी मुदतीत माहिती न दिल्याने मी दिनांक 15/02/2020 रोजी पंचायत समिती कल्याण येथे प्रथम अपील दाखल केले परंतु तेथील प्रथम अपीलीय अधिकारी यांनी 45 दिवसात सुनावणी घेणे बंधनकारक होते परंतु त्यांनी सुद्धा माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करत हेतु पुर्वक माहिती देण्यास टाळाटाळ केली होती.
त्या विरुद्ध मी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ येथे द्वितीय अपील दाखल केले तरी दिनांक 04/05/202 रोजी सुनावणी घेऊन मा आयोगाने जनमाहीती अधिकारी यांचे विरुध्द 25000, रुपये दंड का ॽ करु नये व प्रथम अपील अधिकारी यांनी सुनावणी घेऊन निर्णय पारीत केला नाही.
म्हणुन शिस्तभंगाची कार्यवाही का ॽ करण्यात येऊ नये असा खुलासा मागीतला व अर्जदारला कागदपत्र साठी व मुदतीत माहिती न दिल्याने 5000, रुपये नुकसानभरपाई मंजुर केली तरी ग्रामपंचायत गुरवली येथील विद्यमान ग्रामसेवक यांनी नुकसानभरपाई भरपाई चा 5000, रुपये चा चेक माझ्या नावाने पोस्टाने पाठवला आहे.
राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांचा दणका. |
तरी मुदतीत माहिती न देणारे व कायद्याचा भंग करणारे जनमाहीती अधिकारी यांना मा आयोगाने चांगलीच चपराक दिली आहे तरी त्यांनी मुदतीत खुलासा सादर न केल्यास त्यांचे विरुध्द 25000, रुपये दंड करण्यात यावा यासाठी पुढील पाठपुरावा करत आहे म्हणुन नागरीकांनी माहिती अधिकार कायदा विषयी आधीक जाग्रत होणे आवश्यक आहे तरच भ्रष्टाचाराला आळा घालता येईल
माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे (माहिती अधिकार कार्यकर्ता).