रोजगार हमी योजना | चे अधिकारी ग्रामसेवकांवर भारी मनमानी.

रोहयो चे अधिकारी, ग्रामसेवकांवर भारी मनमानी करतात, योजनेचे फाईली दडपतात.

ग्रामीण बातम्या माहूर : पंचायत समितीचे सहायक कार्यक्रम अधिकारी अरेरावीची भाषा वापरतात, मनरेगाच्या फाईल स्वाक्षऱ्या न करता आपल्या जवळील कपाटात ठेवतात, असे आरोप करीत या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी येथील ग्रामसेवक संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील पंचायत समितीच्या मनरेगा विभागात एस.पी. राठोड (एपीओ) हैं सहायक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
३१ मार्च रोजी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या विरोधातील निवेदन गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांना दिले. राठोड हे ग्रामसेवक संवर्गाला अरेरावीची भाषा वापरतात, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामात अडथळा निर्माण करतात, कुठल्याही कामाच्या चौकशीला सहकार्य करीत नाहीत, सल्ला मसलत न करता परस्पर अहवाल देतात, असे आरोप त्यांच्यावर एकंदरीत केले असून, माहूर पंचायत समितीला पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते ठाण मांडून बसले आहेत. त्यांना माहूर येथून कार्यमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संचिकांच्या प्रवासात ग्रामसेवक मंडळींचा होतोय असहकार.
४ डिसेंबर २०१९ रोजी माहूर पंचायत समिती कार्यालयात रुजू झालो. योजने अंतर्गत माझ्या काळात ४ लाख १७ हजार एवढी कामे झाली आहेत. सचिव या नात्याने लाभाथ्र्यांच्या संचिका ग्रामसेवकामार्फत माझ्या कार्यालयात येणे अपेक्षित असते: । परंतु ग्रामसेवक सहकार्य करीत नसल्याने लाभार्थी थेट माझ्या कार्यालयात येऊन आपली कामे करून घेतात. -एस. पी. राठोड, सहायक कार्यक्रम अधिकारी.
पं. स. माहूर जाधव व सचिव व्ही. एम. जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
माहूर पं. स. कार्यालयातील मनरेगा विभाग व ग्रामसेवक संघटनेच्या ताणतणावाचा विपरीत परिणाम तालुक्यात मागील मनरेगा कामावर होणार नाही, याची दक्षता जिल्हा परिषद प्रशासनाला अध्यक्ष व्ही. एस. घ्यावीच लागणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *