लय भारी योजना उद्यापासून घरोघरी जाऊन सहभागी करून घेणार.

टाटा एआईजी
टाटा एआईजी

लय भारी योजना उद्यापासून घरोघरी जाऊन सहभागी करून घेणार 299 आणि 399 रुपयांचा हप्ता दहा लाखाचा विमा कवच.

कोल्हापूर प्रतिनिधी :  भारतीय डाक विभागाने टाटा एआईजी चा अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रति वर्ष 299 आणि 399 रुपयांचा हप्ता मध्ये विमाधारकास दहा लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले आहे टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही नवीन योजना आणली आहे ही योजना 18 ते 65 वयातील व्यक्तींसाठी आहे या योजनेचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून दोन दिवस पोस्टमन व आवश्यक असणारे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांना या योजनेत सहभागी करून घेतील.

योजनेत एका वर्षा साठी विमा 

ज्यामध्ये व्यक्ती फक्त 299 किंवा 399 रुपयांचा हप्त्यांमध्ये एका वर्षात दहा लाख रुपयांपर्यंतच्या विमा मिळू शकतात यामध्ये विमा धारकांचा अपघाती मृत्यू अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व असल्यास दहा लाख रुपयांपर्यंत संरक्षण दिले जाईल याशिवाय या विमानांमध्ये रुग्णालयात दाखल झाले असते 60000 रुपयापर्यंत खर्च आणि रुग्णालयात दाखल होता घरी उपचार घेतल्यास तीस हजार रुपयांपर्यंतच्या दावा देखील करता येईल त्याचबरोबर रुग्णालयात खर्चासाठी दहा दिवस तुम्हाला प्रति दिन एक हजार रुपये देखील मिळतील कुटुंबाला वाहतुकीसाठी 15 हजार रुपयांची खर्चदेखील मिळणार आहे कोणत्याही कारणाने अपघात व्यक्तीला मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी पाच हजार रुपये व या विमा अंतर्गत किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

 असा करा अर्ज.

 तुम्हालाही या विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खाते असणे आवश्यक आहे नसेल तर तुम्ही नव्याने खाते काढून घ्या आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

 299 व 399 च्या पोलिसी मधील फरक.

 या दोन्ही योजनेसारख्या जसं 399 चा योजनेत विमा धारकांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन मुलांना एका लाखापर्यंतची मदतही शिक्षणासाठी मिळू शकते त्याच बरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्या-जाण्यासाठी कुटुंबीयांना दहा दिवसापर्यंत प्रतिदिन एक हजार रुपये मिळतात.

 वाहतूक खर्च 25 हजार व मृत्यूनंतर 5000 अंत्यसंस्कार खर्च मिळेल पण हे 299 च्या योजनेला शिक्षण खर्च प्रति दिन एक हजार वाहतूक रुपये खर्च 25 हजार अंत्यसंस्कार खर्च 5000 लागू राहील.

 योजनेचा कालावधी.

 या योजनेचा कालावधी एका वर्षाचा असून एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी विमा योजनेची तुमच्या जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नूतनीकरण करावे लागेल.

 यांना ही योजना लागू राहील.

 1) साहसी खेळांमध्ये सहभाग बंजी जम्पिंग की इन रेसिंग इत्यादी.

 2) लष्कर नौदल हवाई आणि पोलीस दलातील व्यक्ती.

 3) प्रत्यक्ष केलेल्या किंवा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यातील सहभाग उदाहरण दंगल गुन्हा गैरवर्तन

 4) आरोग्य संदर्भात असलेली कोणतीही पूर्व विद्यमान स्थिती आजार अपंगत्व इत्यादीमुळे झालेला अपघात.

 5) कोणत्याही विमान किंवा विषारी पोटगी तर धोकादायक गुणधर्म असलेल्या व्यवसायातील कर्मचारी.

 6) उपचार करणारे डॉक्टर जे स्वतः विमाधारक व्यक्ती असेल किंवा या पॉलिसीमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबाच्या जवळचा सदस्य असेल.

 7) वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसताना रुग्णालयात घेतलेला उपचार.

 8) कोणत्याही ड्रायव्हिंग व्यवसायाशी संबंधित व्यक्ती व्यावसायिक ड्रायव्हर

 9) आत्महत्याग्रस्त अल्कोहोल किंवा इतर मादक पदार्थांच्या सेवनाने झालेला अपघात.

 10) हाडांचा ठिसूळपणा होणारे कोणतेही नुकसान.

 11) बाळंतपणामुळे किवा गर्भधारणे मुळे होणारे कोणतेही नुकसान.

 12) खान कामगार बांधकाम कामगार.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *