वारजे माळवाडी येथे उत्साहात संयुक्त जयंती साजरी |
स्वराज्य जननी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख या मातांची संयुक्त जयंती वारजे माळवाडी मध्ये पूजा मोबाईल शॉपी च्या समोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी राष्ट्रमाता च्या पुतळ्यांना पुण्यनगरीचे माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे व माजी नगरसेविका सायली ताई वांजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी दिलीप भाऊ बराटे यांनी मार्गदर्शन केले.
तर चळवळीतील विचारवंत मावळा पैगंबर भाई शेख यांनी यातिन्ही मातांच्या विचारांची सर्वांना माहिती दिली यावेळी वेगवेगळ्या पक्षातील संघटनेतील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील बरेच मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी उमेश भाऊ कोकरे, आलम भाई पठाण, रवी भाऊ वांजळे, दत्ता भाऊ नेटके, अंकुश भाऊ सोनवणे, निलेश आगळे, गुणवंत घोडके, प्रवीण सोनवणे, नानासाहेब ओवाळ, रफिक शेख अनिकेत मारणे, अन्वर भाई पटेल, विशाल ओवाळ, रवी तांबारे, संतोष पिसाळ, बंडू आप्पा गोंधळे, अजितनाथ काळे, संतोष अंकुश.
या कार्यक्रमाचे आयोजन दत्ता चव्हाण, दीपक बलाढे, रियाज शेख यांनी केले