विघुत लोकपाल नागपुरचा महावितरणला दणका.| विज ग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे.

विघुत लोकपाल नागपुरचा महावितरणला दणका.

पैठण  शहरातील  यंशवतनगर येथील  नागरिक श्री नितीन दामोदर वानखडे यांच्या नांवावर  विज मिटर असुन महावितरण कडुन सातत्याने ग्राहकास अंदाजित देयके देवुन विज बिलावर मिटर फाॅल्टी असे नमुद असलेली देयके मिळत होती .

विघुत लोकपाल नागपुरचा महावितरणला दणका.| विज ग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे.


विघुत नियामक आयोग 2021 च्या कृतीच्या मानके विनिमय  2021 नुसार महावितरण विज ग्राहकाला एका आर्थिक वर्षात दोन बिलापेक्षा अधिकची अंदाजित देयके देणार नाही असा नियम आहे .

माञ  विज ग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे यांना महावितरणने एप्रिल  2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात   12 विज देयके अंदाजित दिली .म्हणजे प्रत्येक महिन्याला एक त्यानंतर सुध्दा एप्रिल 2021 ते मार्च  2022   पर्यत  पुन्हा  12 अंदाजित विज देयके देण्यात आली .

त्यानंतर सुध्दा  एप्रिल 2022 ते आॅक्टोबर  2022  पर्यत सात विज देयके अंदाजित दिली.  सतत विज बिलावर  रिडींग न घेताच अंदाजे देयक अशी   नोंद असलेली विज देयके महावितरणकडुन मिळत होती .विघुत नियामक आयोग 2021 च्या कृतीच्या मानके विनिमय 16.3.6 नुसार महावितरण ग्राहकाला एका आर्थीक वर्षात दोन बिलापेक्षा अधिकची अंदाजित देणार नाही असा नियम आहे.

माञ ग्राहकास   एप्रिल 2020 ते मार्च 2021 या आर्थिक वर्षात  12 विज देयके देण्यात आली. एप्रिल 2021 ते मार्च 2022 पर्यत 12 देयके देण्यात आली. त्यांनतर सूध्दा महावितरण यांनी एप्रिल  2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत ऐकून सात विज देयके अंदाजीत दिली वीज पुरवठा सुरू असताना सुद्धा महावितरण कडून वीजबिलावर माहे  आॅगस्ट 2022 मध्ये  टीडी अशी नोंद असलेली वीज देयके ग्राहकास मिळाली मात्र ग्राहक यांनी दिनांक   11 -10-2022 रोजी  महावितरण कडे  अर्ज करुन माझा वीज पुरवठा सुरळीत चालू असून भविष्यात माझ्यावर विज अधिनियम 2003 चे कलम  126 किंवा 135 नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे महावितरणला लेखी कळविले त्यानंतर महावितरण ला जाग आली व त्यांनी   वीजग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे रा. पैठण तालुका पैठण जिल्हा औरगांबाद  यांचा घरगुती विज पुरवठा खंडित केला. मात्र याबाबत  वीज अधिनियम 2003 चे कलम 56  (1) नुसार महावितरण ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करण्यापुर्वी  15 दिवस अगोदर ग्राहकास नोटीस देईल माञ महावितरण कार्यालय यांनी ग्राहकास एस.एम.एस किंवा  लेखी नोटीस  दिलीच  नाही . 

म्हणून ग्राहक श्री नितीन दामोदर वानखडे राहणार  यशवंत नगर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यांनी दिनांक  2- 12- 2022 रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यावर दिनांक  10-1- 2023 रोजी औरंगाबाद येथे सुनावणी झाली त्यानंतर पुन्हा 17-1-2023  व 24 -1 -2023 ला सुनावणी झाली. महावितरण कडून मीटरचे रीडिंग न घेताच प्रदीर्घ काळासाठी सरासरी विज देयके दिल्यामुळे  महाराष्ट्र विघुत नियामक आयोग ( विघुत पुरवठा संहिता वितरण परवानाधारकाच्या कृतीची मानके आणि पाॅवर क्वालीटी ) विनियम 2021  मध्ये नमुद असल्याप्रमाणे  महावितरणने ग्राहकास अडीचशे रुपये नुकसान भरपाई दिली. 

तसेच विज अधिनियम 2003  चे कलम 56(1) नुसार महावितरणने नियमाप्रमाणे  नोटीस न देताच विज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरुन  250 रूपये नूकसान भरपाई मंजुर केली  माञ ग्राहक  तक्रार निवारण मंच औरगांबाद ( महावितरण)  च्या आदेशाने  ग्राहक श्री . नितीन दामोदर वानखडे यांचे  समाधान झाले नाही.

तसेच ग्राहकाने हार न मानता  विघुत लोकपाल नागपुर कडे दिंनाक  8-3-23 रोजी तक्रार दाखल केली. त्यावर दिनांक  11-4-23 रोजी सुनावणी होवुन विघुत लोकपाल नागपुर यांनी ग्राहक श्री. नितीन दामोदर वानखडे यांना संपुर्ण प्रकरणामध्ये झालेल्या मानसिक ञासाबद्दल महावितरणला  2000 रुपये दंड करण्यात आला असे आदेश दिले.


ग्राहकाची प्रतिकिया :- आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना विज ग्राहक श्री. नितीन  दामोदर वानखडे रा. पैठण जिल्हा औरगांबाद यांनी ग्र् ग्राहक राजा जागा हो संघर्षाचा धागा हो…प्रत्येक ग्राहकाने  ग्राहक हक्कासाठी शासनासोबत लढा दिलाच पाहिजे  कारण विघुत लोकपाल नागपुर यांनी दिलेल्या दंडाची नोंद दोषी अधिकारी / कर्मचारी यांच्या सर्विस बुक मध्ये होते हे फार महत्वाचे आहे.

संबधीत अधिकार्‍याच्या पगारातुन करा वसूल.

ग्राहकास तब्बल दोन वर्षापेक्षा जास्त बजावली होती अंदाजित देयके.

सदर प्रकरणात महावितरणकडुन कार्यकारी अभियंता  महावितरण ग्रामिण मंडळ चिकलठाणा  औरगांबाद यांनी महावितरणकडुन बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष    यांनी ग्राहकाच्या वतीने विघुत लोकपाल नागपुर यांच्या समोर बाजु मांडली

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !