विद्यार्थी लग्नाला गेले होते की फिरायला गेले होते.

पालकांनो आपला पाल्य शाळेत कॉलेज ला निघालाय पण तो ती  तिथेच आहेत का याचीअधुन मधुन खात्री करा.

नाशिक : पालकांनी मुलांचे हट्ट पुरविताना मुले आपली फसवणूक करत नाहीना याचा पण विचार केला पाहिजे, नाशिकच्या सिन्नर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याची बाब समोर आली होती, त्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पालकांनो आपला पाल्य शाळेत कॉलेज ला निघालाय पण तो ती  तिथेच आहेत का याचीअधुन मधुन खात्री करा.


याशिवाय आणखी तीन जखमी आहेत, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात असतांना पोलीसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघातातील सर्वजण हे 16 ते 17 वयोगटातील आहे. 

कॉलेजला दांडी मारून ही पोरं लग्नाला गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. त्यात आणखी एक बाब म्हणजे घरून महाविद्यालयाच्या ड्रेसवर आलेल्या या सर्वांनी बाहेर गाडीतच दुसरे कपडे बदलले होते. शिवाय रस्त्यातच यांनी पार्टी केल्याचेही समोर आले आहे.

अपघात झालेल्या स्विफ्ट कारमध्ये दारूच्या बाटल्या, सिगारेट आणि इतर खाद्यपदार्थ आणि महाविद्यालयाचे ड्रेसही आढळून आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी लग्नाला गेले होते की फिरायला गेले होते. यावर शंका येत आहे. त्यातच अपघात झालेली स्विफ्ट कारही विद्यार्थ्याने मामाकडून अर्ध्या तासात कॉलेजला जाऊन येतो म्हणून आणली होती.

नाशिक पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय तर चौघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती ही चिंताजनक आहे.

सिन्नर जवळील मोहदरी घाटात सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास संगमनेरहून नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडर वरून दुसऱ्या मार्गावर गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संगमनेर हून एका मित्राचे लग्न आटोपून ते नाशिकला परतत होते. 5 प्रवाशांची क्षमता असलेल्या स्विफ्ट कारमध्ये 8 मित्र मैत्रिणी बसले होते.

हर्ष बोडकेच्या मामाची ही कार असून अर्धा तास कॉलेजला जाऊन येतो असे त्याने घरी सांगितले होते, त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसून इतर जण कॉलेजच्या नावाखाली घरून निघाले होते. इनोव्हा चालकाच्या तक्रारीनूसार मयत हर्ष बोडके वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणे गाडी चालवणे, ईतरांच्या मृत्यूस तसेच दुखापतीस कारणीभूत होणे आणि मोटर परिवहन कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे –

1. हर्ष बोडके – वय 17

2. सायली पाटील – वय 17

3. मयुरी पाटील – वय 16

4. प्रतीक्षा घुले – वय 17

5. शुभम तायडे – वय 17

*ताजा कलम* 

वरील प्रसंग प्रतिनिधिक आहे असे प्रकार आपल्या शेवगांव  शहरात गावात सुद्धा घडत आहेत काल परवा एका लॉजवर ज्युनियर कॉलेज चे कपडे घातलेली जोडी भल्या सकाळी तोंड बांधुन बाहेर पडत होती  काळजात चर्रर्र झालं कुठे चाललीय हि पिढी हे कुठे तरी थांबायला हवं यात दोष कुणाचा त्या बेजबाबदार पालकांनाच त्या बेजबाबदार शालेय प्रशासनाचा  त्या नालायक लॉज मालकाचा की बेमालूम सर्वांना फसवणाऱ्या त्या नालायक जोडप्याचा अंतर्मुख होऊन विचार करा आपल्या पुढे काय वाढवून ठेवले आहे तुमचा दिवटा आणि दिवटी आपल्या मागे काय गुण  उधळतेय नाहीतर काळ  कोणालाही माफ करणार नाही.

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !