वेळेत वीज न आल्यास महावितरणने भरपाई दिली का?

वेळेत वीज न आल्यास महावितरणने भरपाई दिली का?ग्राहकांचा सवाल : तर आतापर्यंत एकालाही भरपाई नाही.

शिरपूर वीज ग्राहकांना: महावितरणतर्फे देण्यात येणाऱ्या सेवा किती वेळेत मिळायला हव्यात, याची एक वेळ, कालमर्यादा निश्चित आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने वेळेत काम झाले नाही तर दंडाचीही तरतूद केली आहे. परंतु, जागरूकतेच्या अभावी कुणीही दंड मागत नाही, बहुतांश लोकांना तर याची माहितीच नाही. नियामक आयोगानेसुध्दा वेळेत वीज आली नाही म्हणून महावितरणने किती ग्राहकांना लागतात. नुकसान भरपाई दिली आहे, असा प्रश्न विचारला आहे.

वेळेत वीज न आल्यास महावितरणने भरपाई दिली का?


एकालाही भरपाई नाही.

शिरपूर शहर व तालुक्याचा विचार केला तर महावितरणने वेळेत सेवा दिली नाही. म्हणून एकालाही नुकसान भरपाई दिली नाही. यावर कंपनीचे अधिकारी सांगतात की, ग्राहकांनी दंडाची मागणीच केली नाही, असे प्रकरण ग्राहक तक्रार निवारण मंचामार्फत येते. दुसरीकडे ग्राहक मंचचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे अशी प्रकरणे येत नाहीत.

फ्यूज दुरुस्ती शहर :

वीज पुरवठा सुरू असताना फ्यूज गेल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी किमान ३ तासांचा कालावधी लागणे गरजेचे आहे.

भूमिगत लाईन दुरुस्ती शहर :

भूमिगत लाईन दुरुस्तीसाठी शहरी भागात काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना किमान ८ ते १० तास

कोणत्या कामासाठी किती वेळ?

फ्यूज दुरुस्ती ग्रामीण

वीज पुरवठा सुरू असताना फ्यूज गेल्यानंतर तो दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागात किमान ३ तासांचा कालावधी लागणे गरजेचे आहे.

भूमिगत लाईन दुरुस्ती ग्रामीण :

भूमिगत लाइन दुरुस्तीसाठी ग्रामीण भागात काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना किमान २४ तास लागतात.

जळालेले मीटर बदलण्यासाठी शहर :

एखाद्या ग्राहकाचे मीटर जळालेले मीटर बदलण्यासाठी शहरात १८ तास लागतात.

जळालेले मीटर बदलण्यासाठी ग्रामीण

एखाद्या ग्राहकाचे मीटर जळालेले मीटर बदलण्यासाठी ग्रामीण भागात ४८ तास लागतात.

..तर ग्राहकांना ५० किंवा १०० रुपयांची भरपाई

■ वेळेत काम झाले नाही तर आयोगाने दंड निश्चित केला आहे. याअंतर्गत एलटी लाइनच्या ग्राहकांना प्रतितास १०० रूपये (जास्तीत जास्त ५०० रुपये) व एचटी ग्राहकांना प्रतितास १०० रुपये (जास्तीत जास्त १००० रूपयांची तरतूद आहे.)

ग्राहकांना ठाऊक आहे का?

बहुतांश वीज ग्राहकांना याची माहितीच नाही. व्यंकटेशनगरातील रमेश वानखेडे यांनी यासंदर्भात सांगितले की, त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. महावितरणने बिलामध्ये याची माहिती द्यायला हवी, अशी मागणी रमेश वानखेडे यांनी केली आहे.

पाचकंदिल चौकातील अरुण धोबी या व्यावसायिकाचे म्हणणे आहे की, दर शनिवारी ग्राहकांना न कळविता वीज गायब होते. महावितरणचे अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाहीत, दंडाची तरतूद आहे, त्याची नुकसान भरपाईसुध्दा मिळते. मात्र ग्राहकांना याची माहिती नसल्याने याबाबत महावितरण प्रशासनाने जनजागृती अभियान राबविण्याची गरज आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *