शहराला नियमित पाणीपुरवठा ण झाल्यास जण आक्रोश आंदोलन मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

शहराला नियमित पाणीपुरवठा ण झाल्यास जण आक्रोश आंदोलन मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

शेवगांव शहराला नियमित पाणीपुरवठा न झाल्यास जन आक्रोश आंदोलन जि. प सदस्य हर्षदा काकडे मुख्याधिकारी भालेराव यांना दिले निवेदन.

अविनाश देशमुख शेवगाव .

शेवगाव शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता शहराला दर दोन दिवसाने पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आपल्यास्तरावर योग्यती तातडीने कार्यवाही अन्यथा आपल्या दालनासमोर शेवगाव शहरातील समस्त महिला प्रचंड जनआक्रोश आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांनी शेवगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना आज शेवगाव येथे देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हंटले आहे की, शेवगाव शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वारेमाप हाल-अपेष्टा मागील काही वर्षापासून सहन कराव्या लागत आहेत. मात्र संबंधित व्यवस्थापन याकडे कानाडोळा करत आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष कसे जात नाही हा शेवगावकरांना मोठा प्रश्न पडला आहे.

शहराला पूर्वी चार दिवसांनी एकदा पाणी यायचे, त्यानंतर ते आठ दिवसांनी झाले आणि आता तर बारा-तेरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार केला तर शहरातील नागरिकांना एका वर्षात फक्त २४ ते ४५ दिवस पाणी पुरवठा होतो. असे असतांना नागरिकांनी नगरपरिषदकडे पाणीपट्टी का भरावी?असा प्रश्न उभा राहतो.

त्यामुळे नगरपालिकेने जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी आकारली पाहिजे. *शेवगाव- पाथर्डी पाणी पुरवठा योजनांचा स्रोत असलेल्या जायकवाडी धरणामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी असतानाही नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. पाणी विकत घ्यावे लागत आहे.

शहरातील जलवाहिन्या काही ठिकाणी फुटलेल्या असतात त्या वेळेवर दुरुस्त झाल्या पाहिजे. शेवगाव शहरात अनेक अनाधिकृत नळजोड असून त्यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून शहराला दर दोन दिवसाने पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजन व कार्यवाही तातडीने करावी अन्यथा शेवगाव शहरातील समस्त महिला प्रचंड जनआक्रोश आंदोलन करतील असेही निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर ➖️> छाया आढाव, शितल बडधे, कांता धुमाळ, अंजली तिकोणे, रंजना खर्चन, रुपाली बैरागी, सुनिता डमरे, अश्विनी झरेकर, कल्पना थोरात, अनिशा दळे, अनुराधा राजेभोसले, अलकनंदा आव्हाड , छाया चेमटे, यशोधा सोनवणे, पुष्पा गिर्हे, स्वाती ढगे, भाग्यश्री पोटभरे, पल्लवी कणसे, कल्पना आघावणे, गायत्री लबडे, मनीषा गरड, योगिता जाधव, सत्यभामा मगर, पूजा तायडे, मंदाकिनी म्हस्के, मीरा तेलोरे, उषा भणगे, आशा ढोले आदिसह असंख्य महिलांच्या सह्या आहेत.

हेही क्लिक करून वाचा
हेही क्लिक करून वाचा. 

1) धक्कादायक घटना…**मोबाईल सोडून अभ्यासाकडे लक्ष दे म्हटल्याने आत्महत्या.*

2) आता घर बांधणे झाले सोपे*

कारण सिमेंटच्या किमतीत तिसऱ्यांदा घट,* 

3 ) ग्रामसेवक ने केला सहा लाखांचा भ्रष्टाचार.*

या ग्रामसेवकाची सुरुवातीपासून ची चौकशी करावी

4) रोजगार हमी योजना..* 

ग्रामीण रोजगार हमी कायदा चा फायदा कसा घ्याल जाणून घ्या.

5) Pm कुसुम सौरपंप योजना संबंधित माहिती जाणून घ्या

6) चार हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जेरबंद.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !