शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक.

शाळा प्रवेश प्रक्रिया लवकरच होणार सुरु : कागदपत्रे काढण्यासाठी पालकांची लगबग.

रहिवासी अन् उत्पन्नाचा दाखला काढून ठेवला का?

ग्रामीण बातम्या न्यूज नेटवर्क : चालू शैक्षणिक वर्ष संपत असून, नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा व महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेली उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यासारखी प्रमाणपत्रे काढण्यासाठी वेळेवर होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला अजून थोडा वेळ असताना काढून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे.

शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक.

शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक.

शैक्षणिक वर्षे २०२२-२३ अंतिम चरणात आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शेवटच्या टप्प्यात आहेत. महाविद्यालय स्तरावरील परीक्षादेखील सुरू होत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये शाळा स्तरावरील परीक्षादेखील पूर्ण होणार आहेत. परीक्षांचे निकाल घोषित होताच प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये विद्याथ्र्यांची नावनोंदणी केली जाते. अनेक जण निकाल जाहीर झाल्यानंतरच कागदपत्र काढण्यास सुरुवात करतात. त्यावेळी सेतू सुविधा केंद्रांवर होणारी गर्दी, अर्जाचे वाढलेले प्रमाण यामुळे वेळेत कागदपत्रे मिळणे कठीण होते. प्रवेश घेण्यापूर्वी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशास अडचणी येतात. लवकर कागदपत्रे हवे असल्यास सेतू सुविधा केंद्र चालकांकडून अशा वेळी जादा पैशाची मागणी केली जाते. अशा सर्व प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागतो.

प्रमाणपत्र काढा ऑनलाइन.

शाळा-कॉलेज प्रवेशासाठी लागणारी विविध कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने काढता येतात. सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्र, सीएससी सेंटर आदी ठिकाणी कोणत्याही कागदपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

(छ) सेतु सुविधा केंद्र उत्पन्नाचा दाखला.

शाळा-कॉलेज प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. तलाठी यांच्याकडून उत्पन्नाचा दाखला घेऊन तो ऑनलाइन पद्धतीने तहसीलदार यांच्याकडे सादर केल्यानंतर तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र प्राप्त होते.

सेतू सुविधा केंद्रावर गर्दी.

आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु असल्यामुळे पालकांची कागदपत्रे काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील सेतू सुविधा केंद्रावर गर्दी वाढली असल्याचे चित्र आहे. विविध शैक्षणिक कागदांसह अनेक योजनांचे अर्ज भरण्यासाठी नागरिक सेतू केंद्रांवर गर्दी आहेत. शासनाने ठरवून दिल्यानुसारच शुल्क आकारले जात आहे.

शाळा-कॉलेज प्रवेशासाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक.

रहिवासी प्रमाणपत्र.

इयत्ता दहावीनंतरच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते, त्यामध्ये तहसीलदारांकडून निर्गमित करण्यात आलेले रहिवासी प्रमाणपत्रदेखील आवश्यक असते,

जातीचे प्रमाणपत्र.

आरक्षित गटातील प्रत्येक विद्यार्थ्याल जातीचे प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करणे अत्यावश्यक असते. विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यांच्याकडून शिक्षण शुल्क व इतर शुल्क आकारले जात नाही.

आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक लाभ दिले जातात. त्यासाठी आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्रे काढणेदेखील आवश्यक ठरत आहे.

नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गासह इतर गटातील विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन- क्रिमिलिअर प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यामुळे हे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.

‘जास्तीचे पैसे घेतले जात असतील तर करा तक्रार ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्र चालकांनी किती शुल्क आकारावे याबाबत शासनाने दर निश्चित केले आहेत.

त्यानुसारच त्या-त्या कागदपत्रासाठी नागरिकांना पैसे घ्यावे लागतात. त्याउपर जादा पैसे घेतले जात असतील तर संबंधित तहसील कार्यालयात तक्रार दाखल करता येते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *