प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.होते.
शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु |
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या सूचना.
केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव श्री. व्ही. श्रीनिवास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
ऑनलाईन सेवा.
ऑनलाईन सेवांच्या संख्येत वाढ, प्रत्येक विभाग व जिल्ह्याची ‘गुड गव्हर्नन्स रॅंकिंग’, नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या यशोगाथांचे संकलन, तसेच सार्वजनिक तक्रारींवरील कार्यवाहीचा आढावा, असे विविध निर्णय या बैठकीत घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
#eOffice Link
#eGov Link
#GoodGovernance Link