मोफत उपचार मिळतो; पण हातापाया किती पडायचे साहेब? तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांच्या सात दिवसांच्या संपाचा परिणाम.
● ऑन द स्पॉट
ग्रामीण बातम्या नागपूर : शासकीय रुग्णालयातील परिचारिकांसह तंत्रज्ञ व कर्मचारी तब्बल सात दिवसांच्या संपावर गेल्याने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या.
यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मंजूर झालेल्या होत्या. आता या शस्त्रक्रिया योजनेतून होण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना डॉक्टरांच्या हातापाया पडावे लागत असल्याचे वास्तव आहे.
जनआरोग्य योजनेत मंजुरी मिळाल्यानंतर शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया किंवा उचपारासाठी ६० दिवसांचा कालावधी तर खासगी रुग्णालयात ३० दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. त्यानंतरही कोणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना कार्यालयात संपर्क साधावा.
-डॉ. फनिंद्र चंदा, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक. जनआरोग्य योजना
जन आरोग्य: योजना महात्मा ज्योतिबा फुले MJPJAYकाय कागदपत्रे लागतात?
आरोग्य ओळखपत्र, ओळखपत्र नसतील तर शिधापत्रिका किंवा छायाचित्रासह असणारे कोणतेही ओळखपत्र उदा. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व इतर.
काय आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना?
किती विनवणी करायची साहेब
कागदपत्रे जमावयची की पेशंटकडे लक्ष द्यायचे?
१ या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्राची जमवाजमव करताना दमछाक होते. दुसरीकडे त्यांना रुग्णांकडेही लक्ष द्यावे लागते. महत्त्वाचे म्हणजे वेळेत कागदपत्र सादर करून मंजुरी मिळाल्यावरच उपचार किया शस्त्रक्रिया होतात.
उपचाराला मंजुरी; परंतु साहित्यच नाही
मेयोच्या ऑर्थोपेडिक वॉर्डात भरती असलेल्या एका रुग्णाच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी जनआरोग्य योजनेतून उपचाराच्या खर्चाला मंजूर मिळाली; परंतु साहित्य उपलब्ध न झाल्याने १५ दिवसांपासून रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहे. न्यूरो सर्जरीसाठी ४० दिवसांची प्रतीक्षा
मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मेंदूवरील शस्त्रक्रियेचा खर्चाला जनआरोग्य योजनेतून मंजुरी मिळाली; परंतु परिचारकांच्या संपाचा काळात अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. आता शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे एका गरीब महिला रुग्णाने सांगितले. सध्या येथे न्यूरो सर्जरीसाठी ४० दिवसांची प्रतीक्षा आहे.
कोणाला मिळतो मोफत उपचार?
■ गंभीर आजारांवर मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे. राज्यात सध्या ही योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रितपणे राबविली जात आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत केसरी, पिवळे तथा अंत्योदय आणि अन्नपूर्णा रेशनकार्डधारक पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळतो.
जिल्ह्यात ४२ रुग्णालयांत मोफत उपचार
■ जनआरोग्य योजनेत सहभागी शासकीयसह खासगी हॉस्पिटलची संख्या ४२ आहे.
■ सध्या शहरातील मेयो, मेडिकल, एम्स व सुपर स्पेशालिटी तर ग्रामीणमधील असे एकूण ९ शासकीय रुग्णालय तर ३३ खासगी रुग्णालये आहेत.
६४ हजार नागरिकांनी घेतला लाभ.
• १ जानेवारी २०२२ ते १३ मार्च २०२३ या दरम्यान एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ६४ हजार ५७ लाभाथ्र्यांनी शस्त्रक्रिया, उपचाराचा लाभ घेतला.