शेवगांवकर चा दणका रस्त्यावर गटारीवर अतिक्रमण कणारांचा मणका.

मी शेवगांवकर चा दणका मोडला रस्त्यावर गटारीवर अतिक्रमण कणारांचा मणका.

शेवगांव नगरपरिषदेचे वराती मागुन घोडे पावसाळा संपल्यानंतर तीन महिण्यानी मुख्य बाजारपेठेतील नालेसफाई आरोग्य विभाग ऍक्शन मोड मध्ये.

शेवगांवकर चा दणका मोडला रस्त्यावर गटारीवर अतिक्रमण कणारांचा मणका.


अविनाश देशमुख शेवगांव.

आज गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी मुख्य बाजारपेठ मराठी मुलांच्या शाळेसमोर एक टिल्लू JCB आणि ट्रक्टर ट्रॉलीं आणि नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी श्री भारत चव्हाण श्री संजय लांडे श्री. राजू गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी आणि आरोग्या कर्मचारी हजर होतें. 

भर पावसाळ्यात गटारी तुंबलेल्या होत्या पण सार पावसाचं पाणी आणि गटारीचे पाणी लोकांच्या दुकानात जाऊन मोठे नुकसान झाले होतें पण “देर आई दुरुस्त आई” यां हिंदी युक्ती प्रमाणे मुख्याधिकारी श्री. सचिन राऊत यांनी सरसकट नाले सफाई करण्याचे आदेश दिल्याने अनेक व्यापाऱ्यांनी सिमेंट चे वटे लोखंडी जाळ्या पायऱ्या सगळा लवाजमा हटऊन बऱ्याच वर्षापासुण श्वास कोंडलेली गटार शेवगावकरांना पाहायला मिळाली आता सगळ्या बाजारपेठेची गटार मोकळी होणार का याकडे सर्वसामान्य शेवगावकरांचे लक्ष लागले आहे.

ताजा कलमं.

आधीच चहूबाजूने अतिक्रमण झालेला रस्ता त्यात गटारीवर पथारी आणि त्याच्या पुढेहि काही लोकांचे अतिक्रमण होतें पालिकेच्या अचानक नालेसफाई मोहिमेमुळे “अनेकांच्या पोटात गोळा आणि कपाळात #टयां आल्या” राजरोस अतिक्रमण करणारांची हिम्मत फार वाढली होती राम नाम जपणा पराया माल आपणा करणारांची नगरपरिषदेच्या बिन बदल बरसात धोरणामुळे पार गोची झाली आहे.

*अविनाश देशमुख शेवगांव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !