कोणी शेवगांवला पाणी देता का पाणी!!! एक कामं दोनदा आणि शेवगांवला पाणी महिन्यातुन फक्त तीनदा?
उन्हाळ्याची चाहूल लागताच शेवगांव शहराला दहा ते बारा दिवसानी पाणी स्थानिक लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष इलेक्शनचा प्रमुख मुद्दा पाणीप्रश्न हाच राहणार.
{अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
जुनाट झालेली पाईप लंनी मंजूर पाणी येजनेचे अजुन टेंडर टेंडर खेळणं सुरु आहे गेल्या कित्येक वर्षां पासुन शेवगांवला पिण्याचे पाणी वेळेवर आणि मुबलक मिळत नाही* शहरारापासून अवघ्या काही किलोमीटर असणाऱ्या जायकवाडी धरणातून*
शंभर किलोमीटर असणाऱ्या जालना आणि पन्नास किलोमीटर असणाऱ्या “छत्रपती संभाजीनगर” यां शहरांना नियमित पाणी पुरवठा होतो* जिल्ह्याचे खासदार आणि तालुक्याचे आमदार यांनी अधिकाऱ्यांची वारंवार बैठक बोलावूनही आणि तात्पुरत्या उपाय योजना सुचउनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अधिकारी नगरपरिषद शेवगांव आणि पंचायत समिती शेवगांव चा पाणीपुरवठा विभाग आणि संबंधित ठेकेदार काय करतात??? असा सर्वसामान्य शेवगाव करांना पडलेला प्रश्न आहे
मंजूर नवीन पाणी योजना एव्हाना पाईपलाईन चे कामं सुरु होणे अपेक्षित होतें पण कोणाच्या तरी मर्जीतील कंपनीला ते टेंडर मिळाले नाही??? म्हणुन थातुर मातुर कारणं सांगुन सध्या “कोणी गोविद घ्या कोणी गोपाळ घ्या” असं टेंडर टेंडर खेळणं सुरु असुन* सर्व सामान्य शेवगांवकर नियमित पाणी पट्टी मालमत्ताकर आणि त्यावर लाजिरवाणा 2% दंड भरून भरून दमला आहे
*ताजा कलम*
आता जर शेवगांवच्या पुढाऱ्यांच्या दुर्दैवाने नगर परिषदेचे इलेक्शन लागले तर कळीचा मुद्दा शेवगांव शहराची भळभळती जखम महिन्यातुन तीनदा सुटणारे पाणी हाच असणार आहे मध्यंतरी साऱ्या शहरातील चांगले सिनेनट चे रस्ते फोडून एक सहा इंची पाईपलाईन रातोरात लाखो रुपये खर्च करून त्याच पाणी काय चंद्रावर नेलं की काय ???
*अति महत्वाचे*
*येत्या निवडणुकीत जो कोणी मतं मागायला येयील तो जर नियमित पाणी पुरवण्याची हमी घेत असेल तरच शेवगांवकर मतं देतील नाहीतर पोकळ बांबूचे फटके दयायला मागे पुढे पाहणार नाही शेवगांव शहराला येत्या काही दिवसांत टँकर सुरु करण्याची नामुष्की येऊ नये म्हणजे मिळवली.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*समाजक कार्यकर्ता पत्रकार*