आदिवासी समाजातील शिक्षणाची आस असणाऱ्या नवख्या पाखरांना शिक्षणरुपी यशस्वी गगनभरारी उड़ान देणारे शिक्षणाचे महामेरू आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. दाजिमल पावरा गुरुजी .!
श्री. दाजिमल पावरा गुरुजी यांची कामगिरी
शिरपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी कुशीत असणाऱ्या कोडीद गावाचे नाव अनेक चांगल्या कामांसाठी व चांगल्या प्रभावी उपक्रमांची यशस्वी अमलबजावणीसाठी अनेक वर्षांपासून नेहमी सकारात्मक कामासाठी चर्चेत असते. ह्याचे कारणही तसेच आहे. ह्या गावात अनेक विद्वानांचा क्रांतिकारी इतिहास व सगळ्यांना घेऊन गावउभारणीसाठी जटत राहून आज उभे असलेले कोडीद गाव मोठ्या अभिमानाने परिपुर्णतेसाठी वेगाने पुढे आले आहे. विशेषतः ह्या गावातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्रांती आणणारे सर्व योद्धे एकत्र येऊन इतिहासाच्या पुस्तकात गावाचे नाव कोरण्याची तयारी सुरू होईल ह्यात दुमत नाही.
कोडीद गावाचे शिक्षणाचे महामेरू श्री. दाजिमल पावरा गुरुजी
कोडीद गावातील ह्याचाच एक अविभाज्य भाग आहे शिरपूर तालुक्यातील शिक्षणाची आस असणाऱ्या नवख्या पाखरांना शिक्षणरुपी शैक्षणिक क्रांती आणणारे महान योद्धे यशस्वी गगनभरारी उड़ान देणारे ह्याच कोडीद गावाचे शिक्षणाचे महामेरू दाजीमल पावरा गुरुजी हे आहेत असे सर्वश्रुत आहे.
श्री. दाजिमल पावरा गुरुजी यांचे गरिबीतून घर संसार
दाजिमल पावरा सरांचा लहानपणापासूनचा इतिहास हा आदिवासी समाजातील अनेकांच्या जीवनात असतोच आईवडिलांची गरिबी त्या गरिबीतून घर संसार चालवण्यासाठी उदरनिर्वाहासाठी दारू बनवून विकून घर चालवायचे वांदे होतेच असे असतांना दाजिमल रुपी शिक्षणाचे रोपटे त्या घरात वाढत होते.
श्री. दाजिमल पावरा गुरुजी यांचे संघर्षमय शिक्षण
आदिवासी समाजातील अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या त्यावेळेस झोपडीत असणाऱ्या शासकीय आश्रम शाळेत आपले प्राथमिक व माध्यमिक संघर्षमय शिक्षण पूर्ण करून दहावी उत्तीर्ण झालेले गावातून सुरुवातीचेच विध्यार्थी असतील. तेवढ्यावर ते व त्यांचा परिवार थांबले नाही त्यांनी धुळे येथे संघर्षपूर्ण परिस्थितीत डी.एड. करून घरातून गावातून शिक्षकरुपी वटवृक्ष शिक्षणाचे महामेरू आदिवासी समाजातील शिक्षणाची आस असणाऱ्या नवख्या पाखरांना भेटले.
श्री. दाजिमल पावरा गुरुजी यांचे शिक्षणरुपी यशस्वी गगनभरारी उड़ान
अत्यंत शिस्तप्रिय व एका शिक्षकांत आदर्श गुण कोणकोणते असावे ह्यात परिपूर्णता असणारे सरांचा प्रवास हा अधोलिखित आहे त्यांनी १३ डिसेंबर १९९२ रोजी शिक्षणाच्या ह्या पवित्र कार्याची सुरुवात धनपुर तालुका तळोदा येथून केली. तदनंतर ४ जानेवारी १९९६ रोजी कोडीद ह्या त्यांच्या मूळगावी एकूण सर्वाधिक काळ १५ वर्षे आपल्या गावातील पाखरांना शिक्षणरुपी यशस्वी गगनभरारी उड़ान दिली.
ह्यामुळे गावातील शेकडोंच्या सक्षम नागरिक जे क्लास वन अधिकाऱ्यांपासून शिपायांपर्यंत आज नोकरीत, चांगल्या व्यवसायात, चांगल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे नाव असणारे सक्षम अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यानंतर १५ जून २०११ उमरदा येथे तिथून १५ जून २०१९ रोजी कडईपाणी व आता १३ जून २०२३ जामनपाणी ह्या उपरोक्त गावातील पाखरांना शिक्षणरुपी यशस्वी गगनभरारी उड़ान दिली व इथूनच त्यांची ही यशस्वी महासागररुपी आदिवासी समाजाला लाभलेली प्रदीर्घ सेवा ३२ वर्षांच्या कालखंडात ३१ मे २०२४ रोजी समाप्त होत आहे.
श्री. दाजिमल पावरा गुरुजी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
शिरपूर तालुक्यातून दाजिमल पावरा सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेतच पण ते ऑल राऊंडर खेळाडू म्हणून सुद्धा ओळखले जातात त्यांनी स्वतःअनेक मोठे मोठे क्रिकेट स्पर्धेत, कब्बडी स्पर्धत त्यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुक्यातील अनेक उदयन्मुख खेळाडू तयार होऊन अनेक टीमने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आहेत त्यांची चर्चा आजही केली जाते. तेच अष्टपैलू नेतृत्व कौशल्य त्यांनी शिक्षणाची आस असणाऱ्या बरोबर खेळाची आवड असणाऱ्या नवख्या पाखरांना त्यांचे कौशल्य ओळखून त्यांना तालुका जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत ह्या पाखरांनी आपली नावे कलागुणवत्तेच्या जोरावर आपली नावे इतिहासात कोरली आहेत.
ह्या चौहाण परिवारातील श्री.पांडू बाबा व स्वर्गीय आई नुरीबाई ह्या महामेरूने मोठ्या संघर्षातून गरिबीला रडत न बसता कोडीद गावात सर्वांना आपलेसे असणारे आपलेसे वाटणारे सर्वांना घेऊन चालणारे चौहाण परिवारात एक शिक्षणरुपी रोपटे लावले ते आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर करू पाहत आहे अन् भविष्यात अनेकांना आधाराची सावली देईल ह्यात शंका नाही. त्यांच्या रूपाने ह्या छोट्याश्या परिवारात शिक्षणाची ज्योत पेटली ही ज्योत आज घरातील चौहाण कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीत आम्ही डॉक्टर्स, इंजिनियर, उच्चशिक्षित शिक्षक, सामाजिक क्षेत्र रुपी पुढे जाऊ पाहत आहोत.
Related Post :
- आदिवासी समाजाचे नाव गौवरवविणाऱ्या चुनीलाल पावराचा जीवनपरिचय वाचा.
- भारत के आदिवासियों का इतिहास जाने / Adivasi History in India
- क्रांतिवीर खाज्या नाईक महान योद्धाची संपूर्ण इतिहास वाचा / History Of Khajya Naik
त्यांच्यात शिक्षणरुपी ज्योत घरात तेवत असतांना ते स्वस्थ बसले नाहीत त्यांनी मला लहानपणापासूनच माझे डॉक्टर होण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटले मोठ्या संघर्षातून मला घडविले डॉक्टर बनविले सक्षम नागरिक बनविले. त्यांनी मला भावाचा मुलगा म्हणून कधी पाहिलेच नाही आम्ही सुद्धा त्यांना दैवत पेक्षा कमी मानत नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आईवडील दैवत असतातच पण आमच्या आयुष्यात आमचे आईवडील व काकाकाकी असे चार दैवत आहेत.
ह्यांच्या सर्वांच्या एकमेकांना घेऊन चालण्याच्या स्वाभाविकतेमुळे, एकमेकांच्या समजुतीमुळे, पारिवारिक परिपक्वतेमुळे आजही आमचा परिवार एक बंधनात आहे, आम्ही सर्वच भावंड जे कधीच एकमेकांशिवाय राहातचं नाही आम्ही एक आहोत अन् हमेशा असूच. ह्यांच्याच वरील चौघांच्या परिपक्वतेमुळे आम्ही घरात तीन डॉक्टर्स, एक इंजिनिअर, एक शिक्षक, दोन भावी शिक्षक आहोत.
आपल्या आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबात आदर्श सर्वांना घेऊन चालणारा कुटुंबप्रमुख म्हणून, प्रत्येक शाळेत आदर्श शिक्षक म्हणून, अनेकांच्या आयुष्यात आदर्श व्यक्तिमत्व म्हणून दाजिमल पावरा रुपी जन्माला येवो. एक आदर्श काका म्हणून, एक आदर्श वडील म्हणून, एक आदर्श भाऊ म्हणून, आदर्श मुलगा म्हणून, आदर्श पती म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात येवो जेणेकरून आपल्या आदिवासी समाजातील येणारी पिढी शिक्षणरुपी वाघिणीचे दूध पिऊन घुरघुरल्या शिवाय राहणार नाही.!
शिक्षणाचे महामेरू श्री. दाजिमल पावरा गुरुजी सेवापुर्ती व सत्कार समारंभ संपन्न
दिनांक ३१ मे २०२४ रोजी आमचे काका प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा उद्या दिनांक २६ एप्रिल रोजी सेवापुर्ती व सत्कार समारंभ आहे. त्याचे औचित्य साधून मला व्यक्त होऊ वाटले मी थोडासा व्यक्त झालो. लेखांकन – डॉ.हिरा पावरा. 📞 9978085483
Related History Post :
- आदिवासी नानचम्मा यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार.
- आदिवासी राजनीति / नेता राजकुमार रोत का जीवन परिचय पढे
- आदिवासी क्रांतिकारक जीवा वसावा का जीवन परिचय जाने.
- आदिवासी उतरण का महत्व | Utaran
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
- आभा कार्ड काढा सोप्या पद्धतीने
- नवीन विहीर अनुदान योजना
- PMEGP Loan योजना
- Pradhan Mantri Jan Dhan Yojana