आपल्या ग्रुप चे सन्माननीय सदस्य श्री सुनीलसेठ वासुमल आहुजा याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अविनाश देशमुख शेवगाव.
शेवगांव शहराचे भुषण आमचे जेष्ठ बंधु मित्र मार्गदर्शक आर. पी. आय. चे गेली कित्येक वर्षे शार अध्यक्ष ज्यांना समोर पाहिल्यावर आपसूकच तोंडातून “जयभीम” बाहेर पडते.
श्री सुनीलसेठ वासुमल आहुजा याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. |
त्यांचे वडील शेवगांवचे माजी सरपंच स्व. वासुमल वाधुमल आहुजा यांचा समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा माजी सरपंचाचा मुलगा असुन सुद्धा अतिशय साधी राहणी आणि उंचच विचारसरणी मागील वर्षी अतिशय गंभीर आजाराचा यशस्वी सामना करून पुन्हा नवीन जोमाने सामाजिक कार्यात झोकुन देऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन आज कालच्या तरुणांसमोर आदर्श ठेवला.
ताजा कलम.
त्यांचे वडील शेवगांव शहराचे सरपंच असुन सुद्धा गावात कुठे गुंठाभर जागा नाही की गडगंज प्रॉपर्टी नाही {आज काल एखादा गेला बाजार नगरसेवक जरी झाला.
तर कोटीच्या कोटी उड्डाण घेणाऱ्यांना } वडिलांनी घालुन दिलेल्या आदर्शांचे पालन कष्ट आणि सचोटी कायम अंगी बाळगुन आपल्या मुलाला सुद्धा तेच संस्कार देणारे सुनील भाऊ आपल्याकडून उर्वरित आयुष्यात अशीच समाजसेवा घडो हीच आपल्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.
अविनाश देशमुख शेवगाव.
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार.