सक्षम लोकायुक्त विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर करा. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर ची मागणी.
पिंपळनेर – येथील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने पिंपळनेर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार श्री.अनिल उचाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, माहिती अधिकार कायद्यामुळे अनेक सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड होत आहेत.
Pass the Empowered Lokayukta Bill in the Winter Session. |
जागृत नागरिक अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांची वरिष्ठांकडे तक्रार करतात .पण त्या त्या सरकारी विभागातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्याच कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना सांभाळून घेतात व पाठीशी घालतात त्यामुळे काहीच कारवाई होत नाही .
अशावेळी कार्यकर्ते लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करतात .पण सध्याच्या लोकायुक्त यांना कायद्याने शिक्षा व दंड करण्याचे पुरेसे अधिकार नाहीत .पण आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने सक्षम व प्रभावी लोकायुक्त विधेयक मसुदा स्वीकारले आहे व मान्य केले आहे.
आता नव्या लोकायुक्त विधेयकाला मंत्रिमंडळ मंजुरी मिळून ते हिवाळी अधिवेशनात मंजूर होऊन कायद्यात रूपांतरित व्हावे म्हणून माननीय मुख्यमंत्री सो एकनाथरावजी शिंदे यांना निवेदन माननीय तहसीलदार सो पिंपळनेर यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे साक्री तालुका कार्याध्यक्ष – श्री.प्रविण थोरात ,श्री. चंद्रकांत अहिरराव, श्री. दिनेश भालेराव, श्री .पराग महाजन, श्री. उमेश गांगुर्डे, श्री. सोमनाथ बागुल हे उपस्थित होते.