सरपंच यांनी शासननिधीचा वैयक्तिक फायदा घेतला. संदर्भात एक दिवसीय आंदोलन.

Sarpanch took personal advantage of government funds.
Sarpanch took personal advantage of government funds.

जामण्यापाडा येथील सरपंच सरदार हरिदास पावरा यांना सरपंच पदावरून तात्काळ बडतर्फ करणे का मी दिनांक 9 /5/ 20 22 रोजी एक दिवशी आंदोलन.

शिरपूर तालुक्यातील जामण्यापाडा गावातील येथील सरपंच यांनी मासिक सभा किंवा ग्रामसभेत चर्चा न घेता त्यांच्या शेतात ग्रामपंचायतीच्या पैशातून बोरवेल केली आहे. या संदर्भात दिनांक 04/10/2021 रोजी श्री. विलास पावरा ग्रामपंचायत सदस्य मौजे जामण्यापाडा यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्या कडे तक्रार केली होती. तरीही सरपंच यांनी ती बोरवेल ची जागा आज पाहतो ग्रामपंचायतला केलेली नाही. बोरवेल स्वतःच्या शेतात असल्यामुळे ते वैयक्तिक कामांकरिता वापर आहे. असे तक्रार दाराचे निवेदनावरून आजच्या स्थितीत गावातील नागरिकांना पाणी प्यायला भेटत नाही रात्री-बेरात्री नागरिक भेटेल तिथून पाणी आणत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढलेली आहे तरीही सरपंच गावातील नागरीकांना पाणी पुरवठा करत नाही गावात भेदभाव करतात प्रत्येक मासिक व ग्रामसभेत बोरवेलची जादा ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात यावी याकरिता विषय घेतला पण तो कधीही सरपंच यांनी विचारात घेतला नाही कारण ती बोरवेल त्यांच्या वैयक्तिक लाभा करिता वापरायचे आहे.

गावातील नागरिकांना दिवसातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळावे आणि सरपंच यांनी वैयक्तिक लाभापोटी स्वतःच्या शेतात केलेली बोरवेल केलेली आहे.

हेही वाचू शकता. ग्रामपंचायत मध्ये आलेल्या निधी ची माहिती.

माहिती अधिकारातून ग्रामपंचायत ची निधी माहिती मांगा.

सरपंच यांनी लाभाच्या पदावर असताना पदाचा गैरवापर करून बोरवेल चा वैयक्तिक वापर करीत आहेत सदर बोरवेलची सखोल चौकशी करून सरकारी निधीचा पार केला असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे आणि सरकारी निधीची वसूल करण्यात यावी याकरिता श्री. विलास पावरा ग्रामपंचायत सदस्य जामण्यापाडा यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9 5 2005 रोजी एक दिवसीय आंदोलन करीत आहे.

पेसा कायदा नियम व उ्लंघन👈👈  हेही वाचा 

Pdf पहा.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !