सात बारा उतारा आणि आठ – अ उतारा आता एका क्लिकवर मिळेल

सात बारा उतारा आणि आठ – अ उतारा  आता एका क्लिकवर मिळेल. 7/12 passages and 8 – a quotes can now be found with one click.

सात बारा उतारा आणि आठ - अ उतारा  आता एका क्लिकवर.

ग्रामीण बातम्या :  एखादा दाखला हवा असल्यास सर्वसामान्यांना संबंधित कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, यामध्ये महसूल विभागाशी नागरिकांचा जास्त संबंध येतो. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना सातबारा तसेच आठ- असाठी शासकीय कार्यालयात खेटे मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना अवघ्या एका क्लिकवर सातबारा व आठ अ नव्हे तर, फेरफार उतारा, मिळकत पत्रिकाही मिळत आहेत. या माध्यमातून संबंधितांचा वेळ आणि पैशाचीही बचत होणार आहे.

ऑनलाईन सुविधा . ऑनलाइनसाठी कोठे लॉगइन व्हाल?

ऑनलाइन सुविधेच्या माध्यमातून साक्षांकित जुने सातबारा, कोतवाल पुस्तक, गाव नमुना आठ अ परे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार, जन्म आणि मृत्यू रजिस्टर, कढई पत्रक तसेच ऑनलाइन सातबारा आदी सुविधा मिळणार आहेत. जमिनीच्या सातबारासोबत आठ-अ तसेच अन्य उतारा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी मोबाइल वा अन्य साधनांचाही वापर करता येणार आहे. या ठिकाणी लॉगइन केल्यानंतर हवा तो उतारा मिळेल.

कोणते कागदपत्र कशासाठी आवश्यक? ते खालील प्रमाणे.

सातबारा

जमिनीवर कोणाचा मालकी हक्क आहे, हे पाहण्यासाठी सातबारा उतारा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे शासकीय अभिलेख महसूल विभागाकडून दिले जाते क्रमांक ७ आणि १२ ही जमिनीच्या मालकी हक्काबाबतच्या कायद्यातील कलमे आहेत.

आठ अ उतारा

एखाद्या व्यक्तीने आपली जमीन दुसऱ्याला विकल्यानंतर विक्री करणाऱ्या व्यक्तीचा गाव नमुना सातमधील हक्क रद्द होतो. त्या ठिकाणी विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव येते. हा बदल म्हणजेच फेरफार उतारा.

फेरफार उतारा.

एखाद्या व्यक्तीची संबंधित गावामध्ये नेमकी किती जमीन वा क्षेत्र आहे. हे जाणून घेण्यासाठी आठ अ उतारा महत्त्वपूर्ण ठरतो. एकाच गावात एकापेक्षा अधिक ठिकाणी जमीन असेल तर तशी नोंद या उताऱ्याावर येते.

मिळकत पत्रिका.

प्रॉपर्टी कार्डलाच मिळकत पत्रिका म्हटले जाते. आता ही पत्रिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.. आपण घरबसल्या मोबाइलवरही काढू शकतो.

प्रशासन काय म्हणते ?

पूर्वी जमिनीसंदर्भात कुठलाही उतारा घ्यावयाचा म्हटले की शेतकऱ्यांना कार्यालयात खेटे मारावे लागत होते. परंतु, आता है उतारे ऑनलाइन मिळताहेत. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैशाचीही बचत झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *