सावधान!!! तुम्ही शेवगाव मध्ये राहताय किंवा शहरात काही कामानिमित्त दुचाकी चारचाकी घेऊन येताय वाहन चोर आपली वाट पाहत आहेत?
अलीकडे शेवगाव शहरात समशानभुमी ATM मशीन हॉस्पिटल चि पार्किंग कुठलाही गजबजलेला चौक तुम्ही गाडी अगदी दहा मिनिटांसाठी जरी सोडुन गेलात तरी तुमच्याकडे फक्त गाडीची चावी शिल्लक राहील गाडी मात्र निश्चित गायब होईल.
घरापाशी आपली गाडी पार्क करून गणपती विसर्जन पहायला गेलेल्या संभाजी देहाडंराय यांची दुचाकी रात्री 10:00 वाजता गायब झाली आठ दिवसनपूर्वी ATM मधुन पैसे काढण्यासाठी गेलेले नगरपरिषद कर्मचारी संतोष मोहिते बाहेर आले.
तर गाडी गायब मागील महिन्यात मोची गल्ली मध्ये एक वायरमन खांबावर चढले खाली उतरतात तर गाडी गायब अनेक जण कर्ज बाजारी होऊन लक्ष लक्ष रुपयांच्या गाड्या घेतात आणि चोट्टे काही मिनिटात त्यांना पार मोकळे करतात.
माजी सरपंच राहुल मगरे यांची फोर व्हिलर घराच्या पार्किंग मधुन गायब फिरोझ कुरेशी यांची गाडी दोन दिवसांपूर्वी मालवाहतूक गाडी बुद्ध विहार यां गजबजलेल्या एरियातून दिवसाढवळ्या गायब मागील महिन्यात पैठण रोड वरील स्मशान भुमीत संभाजीनगर येथुन आलेल्या पाहुण्याची गाडी गायब विशेष म्हणजे राज्यातील कुठल्याच भागात यां गाड्या चोरीच्या सापडत नाही हे विशेष!!!
ताजा कलम.
शेवगाव शहरात बाहेरगावाहून येऊन चोऱ्या करून पसार होणारी शेजारच्या तालुक्यातील गेवराई पैठण पाथर्डी नेवासा श्रीरामपूर येथील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येऊन शेवगाव शहरात पार्किंग चा प्रश्न असल्याने आडबाजूला लावलेल्या गाड्या सर्सास गायब होतात.
गेल्या काही महिन्यात दोनशेच्या वर दुचाकी आणि दहा ते बारा फोर व्हिलर गायब झाल्या आहेत शेवगाव चे कर्तव्यदक्ष पोलीस निश्चित ते चोर शोधुन काढतील पण आपण आपल्या वाहनांची काळजी घेतली पाहिजे.
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता/ पत्रकार*