सीएससी चालकाची अशीही पदभरती.: नियुक्ती २०१९ मध्ये; रुजू केले २०२३ मध्ये अनोखा प्रताप :
सीएससी चालक या पदाकरिता ग्रामपंचायतीकडे एकूण ७ ते ८ उमेदवारांचे अर्ज आले असताना कोणतीच पात्रता न पाहता किंवा परीक्षा न घेता २०१९ मध्ये नियुक्ती दिलेल्या या उमेदवारास चक्क आता मार्च २०२३ मध्ये रुजू करून घेतले आहे. दिग्रस (खुर्द) येथील दिव्यांग तरुण सत्यजित विठ्ठलराव सोनकांबळे यांना प्राधान्य न देता सरपंच व ग्रामसेवक यांनी साडेतीन वर्षांपासून कामावर रुजू न झालेल्या तरुणास ठराव घेऊन गैरमार्गाने नेमणूक केली असल्याचे नमूद करीत दिव्यांग सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
रुजू न झालेल्या व्यक्तीला ठराव करून
दिव्यांग सत्यजित सोनकांबळे यांनी रिक्त असलेल्या जागेवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ग्रामपंचायत व वरिष्ठ अधिकारी यांना पत्र व्यवहारही केला. डी. एड व एमएससीआयटी पास व संगणक चालवयाचे कौशल्य असून, दिव्यांग असल्यामुळे मला प्राधान्य देण्यात यावे, अशी विनंती केली होती. मात्र, आलेल्या ७ ते ८ उमेदवारांची शैक्षणिक पात्रता न पाहताच नेमणूक करण्यात आली. वरिक्षांना पत्र व्यवहार करूनही दखल घेण्यात आली नाही, उलट २०१९ मध्ये ऑर्डर निघूनही रुजू न झालेल्या कल्याणकर यांच्या नावाचा ग्रामपंचायतीने पुन्हा ठराव देऊन साडेतीन वर्षांनंतर त्यालाच रुजू करून घेतले, सरपंच व ग्रामसेवक यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून नेमणूक केल्याचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सत्यजित सोनकांबळे यांनी म्हटले आहे.
मासिक सभेत नियमानुसार निर्णय घेतला!
ग्रामपंचायतमध्ये मासिक सभा घेऊनच नियमानुसार निवड करण्यात आली आहे, निवडणूक झाल्यानंतर दुसरी बाँडी आली तेव्हा जॉईन करून घेण्यात आले.
प्रकल्पांतर्गत आपले सरकार सेवा केंद्र आहे. या सेवा केंद्रावर केंद्रचालक म्हणून निवड करण्यासाठी ७ ते ८ तरुणांनी अर्ज केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत सत्यजित सोनकांबळे यांनी तालुक्यातील दिग्रस (खुर्द) ग्रामपंचायत येथील सीएससी २.०
ग्रामपंचायतीने मासिक सभा, ग्रामसभा न बोलावता व जाहीर प्रकटन न देता सरपंच व ग्रामसेवकांनी नियमांची पायमल्ली करून सचिन नामदेव कल्याणकर यांच्या नावाचा घ्यावी लागली. गंगाधर कांबळे, ग्रामसेवक दिग्रस (खुर्द)
ठराव दिला. ३ ऑक्टोबर २०१९ ला सचिन कल्याणकर यांची केंद्रचालक म्हणून नियुक्तिपत्र निघाले. नियुक्तिपत्र निघाल्यापासून तो कधीच कामावर रूजू झाला नाही. त्यामुळे ३ वर्षे ५ महिने काम बंद होते.