स्टेजवर कोसळला; नवरदेव : घातक आहे. ध्वनीप्रदूषण.

डीजेच्या आवाजाने नवरदेवाचा मृत्यू! स्टेजवर कोसळला; विवाहातील जल्लोष क्षणात बदलला आक्रोशात.

पाटणा : वृत्तसंस्था ध्वनिप्रदूषण आरोग्याला घातक असते, हे सर्वांनी ऐकले, वाचले, अनुभवले आहे, मात्र त्याचा अतिरेक मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो, याचा प्रत्यय बिहारच्या सीतामढीतील इंदरवा आला. या गावात एक विवाहसमारंभ होता… आणि क्षणात जल्लोषाचे रूपांतर आक्रोशात झाले.. नवरदेवाने वरमाला घातली आणि डीजेचा आवाज वाढविण्यात आला. या मोठ्या आवाजाने नवरदेव थेट स्टेजवरच कोसळला. दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

डीजेच्या आवाजाने नवरदेवाचा मृत्यू!


नवरदेवाचे नाव सुरेंद्र कुमार.

सुरेंद्र कुमार (३०) असे मृताचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सोनबरसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंदरवा गावातील ही घटना आहे. डीजेचा त्रास जाणवत असल्याने नवरदेवाने अनेकदा डीजे बंद करण्यास सांगितले. कुणीही ऐकले नाही. डीजे बंद केला असता तर त्याचा मृत्यू झाला नसता, असे आता दोन्हीकडच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सुरेंद्र हा सर्व.

“भावंडांमध्ये सर्वात लहान होता. तो रेल्वे ग्रुप डी ची लेखी •परीक्षा उत्तीर्ण झाला होता.

ध्वनिप्रदूषण कसे धोकादायक ? ७५ डेसिबलपेक्षा + जास्त आवाजावर बंदी आहे. यापेक्षा मोठा आवाज कुणासाठीही धोकादायक ठरू शकतो. डीजे-बैंड वाद्यांचा मोठा आवाज आणि लख्ख दिवे यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. अस्वस्थता वाढते. रक्ताच्या कमतरतेने हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा स्थितीत मर्यादेबाहेर आवाजाने मृत्यू होऊ शकतो.

लग्नात विघ्नाच्या अलीकडच्या २ घटना

१ ) तेलंगणात निर्मल या गावात लग्नासाठी आलेल्या एका मराठी तरुणाचा मिरवणुकीत नाचत असताना अचानक खाली कोसळून मृत्यू झाला. ही घटना २५ फेब्रुवारीची आहे.

२) तेलंगणातच हैदराबादमध्ये नवऱ्या मुलाला हळद लावताना मोहम्मद रब्बानी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवरच कोसळले, मरण पावले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *