स्वस्त धान्य दुकानदाराच्या दक्षता समितीची फक्त नावालाच.

मागील वर्षी २०२२ मध्ये जवळजवळ सहा महिने धान्यच मिळत नसल्याची तक्रार दुकानदारांनी केली मग स्वस्त धान्य दुकानदार वर्षभर पॉस मशीनवर थम्ब घेऊन कोणते धान्य लाभार्थ्यांना वाटत होतें? आली ना चक्कर ! 

अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

अनेक वेळा निवेदन देऊनही काहीच उपयोग होत नाही .यां संदर्भात शेवगांव चे तहसीलदार छगन वाघ, तालुका पुरवठा अधिकारी विजय चव्हाण, जिल्हापुरवठा अधिकारी जयश्री माळी यांना आता पर्यंत सहा वेळा निवेदन देऊनही काही उपयोग झाला नाहि असेही या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.



दक्षता कमिटीची स्थापना करण्याची मागणी दक्षता समितीची स्थापना नाही.

नवीन सरकार आल्यानंतर जुन्या दक्षता कमिटीच्या निवडी रद्द झाल्या परंतु नवीन निवडी नसल्यामुळे या सर्व गोष्टीवर कोणी नियंत्रण ठेवायचे ! हा मोठा मुद्दा समोर आला आहे. लवकरात लवकर दक्षता कमिटीची स्थापना व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदाराच्या संघटनेने ऑल इंडिया फेयर प्राईम शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे व स्वस्त धान्य दुकानदार संघटना अहमदनगर जिल्हाध्यक्ष सौ मीनाताई कळकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तालुक्यातील १२४ धान्य दुकानदारांनी बुधवार दि ११ रोजी शेवगाव शहरातील भाजपाचे कार्यकर्ते अमोल सागडे यांच्या निवासस्थानी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे यांना

जानेवारी २२ मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा मोफत तांदुळ आणि गहु ५० दुकानदारांना मिळालाच नाही तो स्वस्त धान्य दुकानांचा माल आम्हाला त्वरित द्यावा म्हणजे तो आम्ही जानेवारीमध्ये वाटप करू अशी मागणी यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांच्या संघटनेने यावेळी केली. 

तसेच आम्हाला लोकांच्या रोशाचा सामना करावा लागत असल्याचेही सौ मीनाताई कळकुंबे यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२२ ते डिसेंबर २२ पर्यंतचा अंत्योदय लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा १२४ दुकानांना पुरवठाच झाला नाही.

नियमितचा जुलै २२ पासुन अन्न सुरक्षा कायदा २०१३ चा (अंत्योदय विकतचा ) गहु आज पर्यंत मिळालेला नाही. माहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे विकत चे चलन प्रशासनाकडून भरून घेण्यात आले नाही. परंतु डिसेंबर २२ चे नियमित विकत चे चलन भरून घेण्यात आले आहे. माहे डिसेंबर चा नियमित विकतच्या मालाचे चलन ५ जानेवारी २२ पर्यंत भरून घेण्यात आले आहे.

शेवगाव तालुक्यातील १२४ दुकानदारांना अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी यांना देण्यासाठी माल शिल्लक नाही. रेग्युलर मधील गहु आणि तांदुळ आणि अंत्योदय चा थकलेला गहु एकच वेळेस दिला. तर लाभार्थी लोकाना वाटप करणे सुलभ होईल. याबाबत महसूल व पुरवठा विभाग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही त्याची सरकारी दरबारी कोणीही दखल घेत नसल्यामुळे आम्ही आज लोकप्रतिनिधींना निवेदन दिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ताजा कलम.

यां सर्व प्रकरणाचे मुळ शासकीय गोडाऊन आहे त्याचे गोडाऊन किपर ज्यांना यातील सर्व मखी माहित आहे माल किती आला कुठे कुठे गेला ते का शांत आहेत बरं मागील वर्षी बरेच महिने दुकानदारांना धान्यच मिळाले नाही मग लाभार्थ्यांची तक्रार का नाही कोणाच्या मळयातून गहु आणि तांदुळ आणुन वाटत होतें दुकानदार दादा आपली कातडी वाचवण्यासाठी दुकानदारांनी “वराती मागुन घोडे” *{ 2022 वर्षं संपल्यावर आमदार खासदार याना निवेदन तर काढले नाही ना!! आली ना चक्कर

 क्रमशः अविनाश देशमुख शेवगांव

सामाजिक कार्यकर्ता पत्रकार

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !