हे काय..! विद्यार्थ्यांना नीट वाचताच येत नाही : शासन चळवळ राबविणार, दर शनिवारी दोन तास वाचनासाठी ! ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
![]() |
हे काय तिसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थ्यांना नीट वाचताच येत नाही : |
ग्रामीण बातम्या : तिसरी ते दहावीपर्यंतचे अनेक विद्यार्थी ओघवते वाचनही करू शकत नाहीत. त्यामुळे ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ, रीड इंडिया आणि प्रथम बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाईल.
नास २०२१ च्या अहवालानुसार हे उपक्रम होणार
• दर शनिवारी वाचनासाठी दोन तास, गोष्टींचा शनिवार, आनंदाचा तास, उपलब्ध अॅप्स आणि डिजिटल संसाधनांच्या वापराला प्रोत्साहन, रीड इंडिया सेलिब्रेशन, ग्रंथोत्सव आणि पुस्तकांचे प्रदर्शन आदी उपक्रम यानिमित्ताने राबविले जाणार आहेत.
तिसरीतील ३० टक्क्यांहून अधिक मुले लहान मजकूर वाचू शकत नाहीत. पाचवीपर्यंतची ४१ टक्के मुले – मुले वाचत नाहीत असे सर्रास म्हटले जाते. याचे खरे कारण म्हणजे पालक, शिक्षक वाचत नाहीत हे आहे. पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्याऱ्या कोणत्याही उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि समाजानेही स्वागतच करायला हवे. – डॉ. सुनीलकुमार लवटे, साहित्यिक, शिक्षक
संबंधित लेख :
त्यांच्या स्तरावरचे वाचन योग्य पद्धतीने करू शकत नाहीत तर आठवीपर्यंतची ४३ टक्केच मुले-मुली योग्य पद्धतीने वाचू शकतात. लहानपणापासूनच या मुलांना त्यांच्या मातृभाषेतील कथांची पुस्तके वाचण्याचा सराव झाला तर आधीचे चित्र बदलू शकते.
याआधीच्या प्रयोगातून तसे सिद्धही झाल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २०२६ पर्यंत राज्यातील तिसरीपर्यतचे प्रत्येक मूल समजपूर्वक आणि ओघवते वाचन करेल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
