१२ जानेवारी देशभरात साजरा करणारा राष्ट्रीय युवा दिवस / National Youth Day in Marathi

National Youth Day – : राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी – स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणजेच १२ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता (कोलकाता) येथे झाला. 

National Youth Day in Marathi
National Youth Day in Marathi 


स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त हे होते. प्राचीन वेदांचा चांगला अभ्यास असल्यामुळे ते प्रख्यात अध्यात्मिक गुरु होते. १८८१ मध्ये स्वामी विवेकानंद यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस यांना गुरु मानले आणि वयाच्या २५ व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या प्रभावाने संन्यास स्विकारला. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी कलकत्ता (कोलकाता) येथे ‘रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी १८९८ मध्ये गंगा नदीच्या काठावर बेलूर येथे ‘रामकृष्ण मठाची’ स्थापना केली. स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, साहित्य, कला, शास्त्रीय संगीत इ. चे ते उत्तम जाणकार होते. 
स्वामी विवेकानंद यांनी केवळ भारतभ्रमणच केलेले नाही, तर जगातील अनेक देशांनाही भेट दिलेली आहे. अमेरिकेतील शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद सहभागी झाले होते. या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी ‘माझे ‘भाऊ आणि बहीण’ असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर येथील सभागृहात पूर्ण दोन मिनिटे टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. स्वामी विवेकानंद यांच्या भारदस्त आणि ओजस्वी वाणीमुळे भारताच्या इतिहासात धर्म परिषदेतील ही घटना म्हणजे अभिमानाची आणि सन्मानाची घटना ठरली.

राष्ट्रीय युवा दिन अर्थ:

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. १९८४ मध्ये भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. त्यानंतर १९८५ पासून दरवर्षी भारतभर १२ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. 

स्वामी विवेकानंद यांनी अल्प जीवनकाळात जे कार्य केले त्यामुळे भविष्यातील अनेक पिढ्यांना हे मार्गदर्शक ठरलेले आहे. म्हणून बुद्धिमान, ओजस्वी, अष्टपैलू आणि तेजस्वी अशा स्वामी विवेकानंद यांच्या विचार, कार्य आणि भूमिकेचा आदर्श भारतातील सर्व तरुणांनी घ्यावा, या उद्देशाने १२ जानेवारी हा दिवस भारतभर ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. स्वामी विवेकानंद यांचे विचार, तत्त्वज्ञान आणि त्यांची शिकवण हा भारतातील एक महान सांस्कृतिक आणि पारंपारिक ठेवा आहे. 

हेही वाचा : 

  • १) १० डिसेंबर मानवी हक्क दिन लिंक 
  • २) २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन लिंक 

भारतातील तरुण पिढीला स्वामी विवेकानंद हे कायम स्मृतीत राहावेत आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार, कार्य आणि भूमिकेतून तरुणांनी प्रोत्साहन घ्यावे, यासाठी दरवर्षी १२ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यास १९८५ पासून भारतात सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी नवीन विषय घेऊन युवकांचे राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान असावे, त्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे, 

या उद्देशाने तसेच सरकार आणि युवक यांच्यामध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या माध्यमातून एक दुवा निर्माण व्हावा, या उद्देशाने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. एक तरुण, तेजस्वी आणि तपस्वी म्हणून स्वामी विवेकानंद यांनी केवळ भारतातच नव्हे, तर परदेशामध्येदेखील भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविण्याचे कार्य केले. कारण साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास इ. वेगवेगळ्या विषयात स्वामी विवेकानंद हे प्रकांड पंडित होते. स्वामी विवेकानंद यांनी योग, राजयोग आणि ज्ञानयोग असे ग्रंथ लिहून जगातील तरुणांना नवीन मार्ग दाखवला, युगानुयुगे तरुणांसमोर आदर्श म्हणून उभा राहील. जो मार्ग भविष्यातील आहे.
स्वामी विवेकानंद एक देशभक्त संत होते.

कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद. साप जानना जागा मान म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन हा भारतातील सर्व तरुणांना समर्पित दिन आहे. ज्या तरुणांकडे भारतासाठी निरोगी आणि चांगले भविष्य घडवण्याची क्षमता आहे, अशा तरुणांशी स्वामी विवेकानंद यांचे अगदी घट्ट नाते तयार झालेले होते. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी देशभरातील शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये चर्चासत्र, निबंध लेखन, खेळ, योग, परिषद, गायन, संगीत, व्याख्यान इत्यादी विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन केले जाते. 

राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून देशातील राज्यांमध्ये हा दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचेही आयोजन करून या महोत्सवातून एकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देऊन तरुणांना या कार्यक्रमात अधिकाधिक प्रमाणात सहभागी करून घेतले जाते. 

या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना स्फूर्ती आणि प्रोत्साहन दिले जाते. कारण स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे. स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण आणि त्यांचा आदर्श भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे, म्हणून देशभरातील सर्व तरुणांचे ते प्रेरणास्थान ठरतात. स्वामी विवेकानंद है भारतातील एक समाजसुधारक, तत्वज्ञ आणि विचारवंत होते. 
अशा महान व्यक्तीचा आदर्श तरुणांनी घ्यावा, या उद्देशाने त्यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारत हा तरुणांचा देश आहे, कारण भारतात एकूण लोकसंख्येत सर्वात जास्त लोकसंख्या ही तरुणांची आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा भारतातील ऊर्जा जागृत करणे, त्याचबरोबर सामाजिक बदल करण्याची शक्ती असणाऱ्या तरुणांना सामाजिक बदलासाठी प्रोत्साहन देणे आणि याद्वारे चांगला देश बनविण्याचा प्रयत्न करणे, या उद्देशाने स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ (National Youth Day – 12th January):  म्हणून साजरी केली जाते. स्वामी आणि विकासासाठी आवश्यक असलेला.

म्हणूनच तरुणामधाल शाश्वत ऊर्जा शक्ती जागृत करण्याचा आणि या तरुणांना प्रेरित करण्याचा प्रयत्न आपल्या विचार आणि भूमिकेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी केला होता. म्हणूनच तरुणांमधील प्रचंड शक्तीविषयी आत्मविश्वास असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची जयंती ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरी करून युवकांमधील शक्तीला जागृत आणि प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जातो.


राष्ट्रीय युवा दिन – उद्देश :

१) स्वामी विवेकानंद यांच्या अमूल्य व प्रेरणादायी विचार, भूमिका आणि दृष्टीकोनाद्वारे तरुणांना प्रोत्साहित करणे.

२) तरुणांमधील शाश्वत ऊर्जा शक्ती जागृत करणे.

३) स्वामी विवेकानंद यांचे जीवन व विचारांमधून तरुणांना प्रेरणा देणे..

४) स्वामी विवेकानंद यांच्या आदर्श विचार व तत्त्वज्ञानाकडे तरुणांना आकर्षित करणे. स्वामी विवेकानंद यांचे आदर्श विचार तरुणामध्ये रुजवणे.

५) स्वामी विवेकानंद यांच्या विचार व भूमिकेचा तरुणांमध्ये प्रसार करणे.

६) राष्ट्रउभारणीच्या कार्यात स्वामी विवेकानंद यांच्या विचारातून तरुणांना प्रोत्साहन देणे.

७) सरकार आणि करणे. युवक यामधील दुवा म्हणून राष्ट्रीय युवा दिन साजरा

८) स्वामी विवेकानंद यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची तरुणांना ओळख करून देऊन स्वामी विवेकानंद यांचा सन्मान करणे.

९) तरुणांच्या शक्तीवर आधारित सक्षम देश बनविण्याचा मार्ग तरुणांना दाखवणे.

(१०) स्वामी विवेकानंद यांचे शिक्षण व आदर्श भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्थान म्हणून प्रक्षेपित करणे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *