२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन / National Voters Day

राष्ट्रीय मतदार दिन – २५ जानेवारी (National Voters Day – 25th January) : 

राष्ट्रीय मतदार दिन – अर्थ : जगातील कोणत्याही लोकशाहीवादी देशात सरकार तयार करण्यामध्ये सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतात मतदारांना त्यांच्या अनमोल मताचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी ‘२५ जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून विविध उपक्रम आयोजित करून साजरा केला जातो. 

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन / National Voters Day
२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन / National Voters Day


स्वातंत्र्यानंतर भारतात २५ जानेवारी १९५० रोजी केंद्रीय स्तरावर निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती, म्हणून भारतात दरवर्षी केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणजेच ‘२५ जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारतात २५ जानेवारी २०११ पासून ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा केला जातो, कारण २५ जानेवारी २०११ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यास सुरुवात झाली. नुकताच २५ जानेवारी २०२२ रोजी भारताने आपला बारावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला. भारतात सार्वत्रिक निवडणुकीनंतर लोकशाहीतील सर्वात मोठा सण म्हणून राष्ट्रीय मतदार दिनाकडे बघितले जाते, कारण लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मताला अत्यंत महत्त्व असते. त्याचप्रमाणे लोकशाहीत मतदान करणे, हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. 

राज्य मतदार दिन 

भारतीय लोकशाहीमधील नागरिकांची मतदानाविषयी वाढत जाणारी उदासीनता आणि त्यामुळे मतदानाची घसरणारी टक्केवारी यामुळे प्रत्येक स्तरावर होणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने २०११ पासून भारत सरकारने भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस म्हणजेच ‘२५ जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. 

या दिवशी निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानाबाबत अधिक जागरूक करण्यासाठी दरवर्षी अठरा वर्षाच्या वरील नव मतदारांना ओळखपत्र प्रदान करून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या दिवशी प्रत्येक मतदाराला त्याच्या मतदान शक्तीची जाणीव करून दिली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी भारतातील प्रत्येक मतदार आपल्या देशाच्या प्रत्येक स्तरावर होणाऱ्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्यासंदर्भातील शपथ घेतो. 

२५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून प्रत्येक भारतीय मतदारांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी प्रत्येक भारतीय मतदाराला त्यांच्या मतदानाचा हक्क आणि कर्तव्याची आठवण करून दिली जाते. त्याचपद्धतीने या दिवशी प्रत्येक नागरिकाचे मत राष्ट्रनिर्मितीमध्ये किती अमूल्य आहे, तसेच प्रत्येक मतदाराचे मत देशाच्या भविष्याचा पाया मजबूत करीत असते, ही बाब मतदारांना पटवून दिली जाते. 

 राष्ट्रीय मतदार दिनाच्या जनजागृती 

भारतीय लोकशाहीमध्ये जास्तीत-जास्त नागरिकांचा आणि मतदारांचा राजकीय सहभाग वाढावा, त्याचबरोबर मतदारांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठी शासकीय स्तरावर तसेच विविध सामाजिक संस्थांकडून राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी मतदार जनजागृती करण्यासाठी विविध मतदार

जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उदा. रॅली, व्याख्यान, चर्चासत्र, परिषदाचे आयोजन, घोषवाक्य, बादविवाद, वक्तृत्व, रांगोळी इ. विविध स्पर्धा आयोजन विविध स्तरावर केले जाते. भारतीय लोकशाही अधिक सक्षम, मजबूत आणि अखंड करण्यासाठी मतदारांचा अधिकाधिक राजकीय सहभाग नोंदवणे, त्याचप्रमाणे विविध निवडणुकीमधून योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदारांना मतदान शक्तीबद्दल जागृत करण्याचे कार्य राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून केले जाते. 

मतदानाचा हक 

भारतीय संविधानाने अठरा वर्षावरील प्रत्येक नागरिकाला दिलेला मताधिकार हा अत्यंत अनमोल अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने ‘मतदानाचा हक जागृतपणे वापरून आपल्या देशाला विकासाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी जागरूकपणे मतदान हक्काचा वापर करणे आवश्यक आहे. 

भारतीय लोकशाहीच्या उज्वल भविष्य काळासाठी अधिकाधिक मतदार आणि नागरिकांनी राजकीय सहभाग घेऊन लोकशाहीतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महत्त्वपूर्ण मूल्यांना अधिक बळकटी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, परंतु त्यासाठी अगोदर संविधानाने प्राप्त करून दिलेल्या मतदान अधिकाराची शक्ती मतदारांनी ओळखणे अत्यंत आवश्यक आहे आणि या शक्तीची ओळख पटवून देण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. 

भारतीय लोकशाहीमध्ये विविध स्तरावर होणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारांनी मतदानाच्या हक्काचा वापर न केल्यामुळे मतदारांचा प्रतीनिधित्वाबद्दलचा कल पूर्णपणे लक्षात येत नाही. त्यामुळे विविध स्तरावरील निवडणूक प्रक्रियेत सर्व मतदारांनी सहभागी होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जनप्रतिनिधीत्व देशासमोर येऊ शकेल. 

Related Post :  १२ जानेवारी देशभरात साजरा करणारा राष्ट्रीय युवा दिवसजगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारतीय लोकशाहीकडे बघितले जाते, त्या लोकशाहीतील मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिनाच्या • दिवशी प्रत्येक मतदाराला सक्रियपणे मतदान रुपी राजकीय सहभाग घेऊन आपली संविधानिक जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. 

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन  थोडक्यात

भारतीय लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारतीय लोकशाहीचा भविष्यकाळ उज्वल बनवण्यासाठी, भारतातील प्रत्येक मतदारांना मतदान शक्तीची ओळख करून देण्यासाठी, मतदानाविषयी मतदारांमध्ये जागृती करून निवडणुकीतील घसरलेली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे मतदान रुपी हक्क आणि कर्तव्याचा अधिकाधिक वापर करण्याच्या उद्देशाने २५ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो.
राष्ट्रीय मतदार दिनाचा उद्देश : भारतात दर वर्षी २५ जानेवारी हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पुढील उद्देशानुसार

  • १) मतदारांना त्यांच्या मताच्या शक्तीची जाणीव करून देणे.
  • २) मतदारांना त्यांच्या मतदान या कर्तव्याची व हक्काची आठवण करून देणे.
  • ३) मतदारांमध्ये जनजागृती करणे.
  • ४) मतदानाची कमी होणारी टक्केवारी वाढवणे.
  • ५) मतदानाविषयी मतदारांमधील उदासीनता दूर करणे. 
  • ६) नागरिकांचा अधिकाधिक राजकीय सहभाग वाढवणे.
  • ७) ‘भारतीय लोकशाहीतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही मूल्यांना अधिक बळकटी प्राप्त करून देणे..
  • ८) देशात निष्पक्ष निवडणुका घडवून आणणे.
  • ९) भारतीय लोकशाही अधिक बळकट बनवणे.
  • १०) मतदारांना मतदान करण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करून आपली संविधानिक जबाबदारी पार पाडण्यास उद्युक्त करणे.


२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस उद्देश काय आहे.
Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *