२६ जानेवारी ( Republic Day of India – 26 January ): भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिन अर्थ: २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण माहिती भारतात ‘ भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. / Republic Day of India In Marathi
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन / Today History 26 January |
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असले, तरीदेखील १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या कालावधीत भारताला स्वतः चे कोणतेही संविधान नव्हते. त्यामुळे या कालावधीत भारताचा राज्यकारभार १९३५ च्या भारतीय संघराज्याच्या कायद्यानुसार चालत होता.
सबंधित लेख वाचा : २६ जून सामाजिक न्याय दिन
२६ जानेवारी विषयी माहिती
भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लिहून तयार झालेले असले तरी, त्याची अंमलबजावणी मात्र त्या दिवसापासून झालेली नाही, तर भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला २६ जानेवारी १९५० पासून प्रारंभ झालेला आहे. म्हणून दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक गणराज्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटिशकाळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर येथील अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात तिरंगा संपूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या ऐतिहासिक घटनेला कायमस्वरूपी स्थान मिळावे तसेच त्या दिवसाची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमस्वरूपी राहावी म्हणून २६ जानेवारी रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान लिहून पूर्ण झालेले असले, तरीदेखील त्याची अंमलबजावणी त्याच दिवशी न करता ती २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली.
२६ जानेवारी थोडक्यात
थोडक्यात २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाल्यामुळे हा दिवस संपूर्ण भारतात ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला. जातो. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यामुळे भारतात लोकशाहीच्या एका नवीन पर्वाला सुरुवात झाली आणि भारत या दिवसापासून खऱ्या अर्थाने लोकशाही, सार्वभौम, प्रजासत्ताक, गणराज्य बनला. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने राज्य चालविण्याचा घटनात्मक अधिकार प्राप्त झाला.
२६ जानेवारी ‘भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिन’ हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी देशभरात भारतीय राष्ट्रध्वजाचे आरोहण करून त्याला मानवंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हणून त्याप्रती, आदर व्यक्त केला जातो.
26 जानेवारी अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
२६ जानेवारी रोजी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे मोठे लष्करी संचलन आयोजित केले जाते. रायसीना हिलपासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गावरून हे संचलन मार्गस्थ होते. भारतीय लष्कराच्या संचलनामध्ये विविध फौजांनी दिलेली मानवंदना भारताच्या राष्ट्रपतींकडून स्वीकारली जाते. या दिवशी भारतीय राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामीदेखील दिली जाते.
२६ जानेवारी ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’
२६ जानेवारी ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ |
२६ जानेवारीच्या नवी दिल्ली येथील मुख्य शासकीय समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रित करण्यात येते. या दिवशी नवी दिल्ली येथील अमर जवान ज्योती या भारतीय वीर सैनिकांच्या स्मारकाला भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करुन भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्याचप्रमाणे देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ देऊन २६ जानेवारी या दिवशी गौरवून सन्मानित करण्यात येते.
२६ जानेवारी भाषण मराठी / Republic Day Speech
२६ जानेवारी रोजी लष्कराच्या संचलनाबरोबरच भारतातील विविध घटकराज्यातील संस्कृतीची झलक प्रदर्शित केली जाते. विविध घटकराज्य आपापल्या राज्याची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ तयार करून त्याची झलक या संचलनामध्ये प्रदर्शित करीत असतात. राज्यांकडून प्रदर्शित करण्यात येणाऱ्या
चित्ररथाच्या सादरीकरणाला केंद्र शासनाकडून विशेष पारितोषिक देण्यात येते. त्यामुळे बहुतेक घटकराज्य चित्ररथ स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आप-आपल्या राज्यातील संस्कृतीचे अधिक चांगल्या पद्धतीने प्रदर्शन चित्ररथाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत असतात. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या चित्ररथ प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीच्या विविधतेतून एकता या वैशिष्ट्याला देखील मानवंदना दिली जाते. बीटिंग रिट्रीट या कार्यक्रमाने भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता केली जाते.
भारताने भारतीय प्रजासत्ताक दिनाची ७२ वर्ष पूर्ण करून २०२२ मध्ये ७३ व्या वर्षात पदार्पण केलेले आहे.
भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिनाचा उद्देश :
- १) भारतीय संविधानाप्रति आदर व्यक्त करणे.
- २) विविधतेने नटलेल्या भारत देशात ऐक्य टिकवून ठेवणे.
- ३) भारतीय लोकशाही अधिक सक्षम करणें. त्यासाठी लोकशाही पर्वात अधिकाधिक जनतेला सहभागी करून घेणे.
- ४) भारतीय प्रजासत्ताक, सार्वभौम, गणराज्य दिनाविषयी नागरिकांना सजग करणे.
- ५) प्रत्येक भारतीयांच्या मनात देशाभिमान जागृत करणे आणि तो टिकवून ठेवणे.
- ६) भारतीय जनतेला प्राप्त झालेल्या सार्वभौमत्वाच्या आधारावर मिळालेल्या राज्य चालविण्याच्या अधिकाराची जाणीव करून देणे.
- ७) भारतीय संविधान हा भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित करणे.
- ८) प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्राभिमान जागृत करणे.
- ९) भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना देणे.
- १०) भारतीय प्रजासत्ताक गणराज्य दिनाचे महत्त्व पटवून देणे.
- ११) भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीमुळे भारतीय लोकशाहीत सुरू झालेल्या नवीन पर्वाची नागरिकांना ओळख करून देणे.