२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन Constitution Day of India In Marathi

भारतीय संविधान दिन- २६ नोव्हेंबर (Constitution Day of India 26th November) : भारतीय संविधान दिन अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला जुलै १९४६ मध्ये प्रारंभ झालेला होता. त्यानुसार डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक स्वरूपाची घटना समिती स्थापन करण्यात आलेली होती.

भारतीय संविधान दिन- २६ नोव्हेंबर (Constitution Day of India 26th November) :
 (Constitution Day of India 26th November) : 


तसेच भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी २९ ऑगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात येऊन या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समिती मधील अन्य सदस्यांनी जगातील विविध देशांच्या राज्यघटनांचा मसूदा अभ्यासला आणि शेवटी विविध बैठका व चर्चेअंती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा अंतिम मसुदा तयार करून तो घटना समितीकडे सादर केला. 

अशाप्रकारे मसुदा समितीने तयार केलेल्या भारतीय संविधानाच्या अंतिम मसुद्याचा स्विकार भारतीय घटना समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केला. म्हणून ज्या दिवशी मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून घटनासमितीला सादर केला आणि घटना समितीने अंतिम मसुद्याचा स्विकार केला, तो दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

मात्र भारतीय संविधानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला २६ जानेवारी १९५० पासून प्रारंभ झाला. थोडक्यात भारतीय संविधान तयार करून पूर्ण झाल्याच्या दिवसाची आठवण म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून विविध प्रकारचे उपक्रम राबवून साजरा केला जातो. 

भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे, म्हणून भारत सरकारने २०१५ हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वी जयंती वर्ष अर्थात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर २६ नोव्हेंबर २०१५ रोजी अधिकृतपणे पहिला ‘संविधान दिन’ साजरा केला. 

त्यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक आणि सशक्तीकरण मंत्रालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि तेव्हापासून दर वर्षी ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतात विविध प्रकारचे उपक्रम राबवून ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यात यापूर्वीच म्हणजे २४ नोव्हेंबर २००८ मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केलेले होते. ‘२६ 

जातो. भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे भारतीय नागरिकांना विविध प्रकारचे घटनात्मक मूलभूत हक्क मिळाले. त्याचबरोबर संविधानाच्या अंमलबजावणीमुळे आपण एक स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक आहोत, अशाप्रकारची भावना जनतेमध्ये निर्माण झाली. 

भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मुलभूत हक्कांनी नागरिकांची ढाल म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे संविधानाने निश्चित केलेल्या मुलभूत कर्तव्यामुळे नागरिकांना आपल्या जबाबदारीची योग्य जाणीवदेखील झाली.

संविधान दिनाचा उद्देश : 

२६ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून उत्साहात ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.  २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत;

१) भारतीय संविधानाविषयी जनजागृती करणे.

२) भारतातील तरुण-तरुणींमध्ये संविधानाची विविध मूल्य रुजवणे.

३) भारतीय संविधानाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा प्रसार करणे.

४) भारतीय नागरिकांमध्ये आपण स्वतंत्र देशातील स्वतंत्र नागरिक असल्याची भावना निर्माण करणे.

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीमधील योगदानाचा सन्मान करणे.

६) भारतीय संविधानाचे महत्त्व भारतीय जनतेला पटवून देणे.

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाविषयीच्या विचारांचा प्रसार करणे.

८) भारतीय नागरिकांना आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !