2024 लोकसभा निवडणूक : पैसे वाटतात, दारूचा वापर होतोय तर डायल करा १९५० Tool Free Number वर आता पर्यंत नागरिकांनी केल्या २४७ तक्रारी
2024 लोकसभा निवडणूक : आता पर्यंत किती तक्रारींची घेतली दखल ?
Dainik Gramin Batmya : लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास त्याची तक्रार नोंद करण्यासाठी निवडणूक विभागाने १९५० हा टोल फ्री क्रमांक दिला असून, त्यावर आतापर्यंत २४७ तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जातात. सर्वसामान्य नागरिकही निवडणूक आयोगाचे कान, डोळे होऊ शकतात. त्यासाठीच सी व्हीजील अॅप आणि १९५० हा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान पैशांची मागणी करणे किंवा इतर कारणांवरून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास येत असेल तर त्याची थेट तक्रारही करता येते. त्यासाठी मोबाइल अॅप व मोबाइल क्रमांकही उपलब्ध केला आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
१९५० या क्रमांकावर आतापर्यंत २४७ तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. कोणत्याही मोबाइलवरून थेट 1950 १९५० हा क्रमांक डायल केला जाऊ शकतो. त्यावर रीतसर तक्रार नोंद करता येते. ही सेवा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
CALL सी व्हीजीलवर ५७ तक्रारी झाल्या आहेत. 2024 लोकसभा निवडणूक
- सी व्हीजील अॅपवरदेखील तक्रार करण्याची सुविधा आहे.
- आतापर्यंत ५७ तक्रारी या अॅपवरून प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.
- त्यापैकी २८ तक्रारींमध्ये कारवाई करण्यात आली आहे.
- सी व्हीजील हे अॅण्ड्राईड अॅप उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो.
- तसेच केवळ घटना चित्रीत करण्याची अनुमती देतो.
CALL सी व्हीजीलवर येथे करा तक्रार.
दोन्ही सुविधांचा लाभ घ्या 2024 लोकसभा निवडणूक
आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास त्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी सी व्हीजील अॅप आणि १९५० हा क्रमांक नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध करून दिला आहे. या दोन्ही सुविधांचा लाभ घ्यावा. -गंगाधर हरलोड, कक्ष प्रमुख.
Related News :
- आचारसंहिताचे नियम कडक आहे, काय करावे आणि काय करू नये एकदा वाचाच
- Evm संदर्भातील Video Facebook वर दाखवला जात नाही.
- PM Narendra Modi यांचे देशभरातील जाहिराती हटवा.
- 2 पेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच
- मतदान कार्ड होणार आधार कार्ड शी लिंक.