सुरगाण्यातील करंजूल (सु) येथील बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम 6 हजार केशर आंब्याची लागवड : A unique initiative of Bajrang Group at Karanjul in Surgana

सुरगाण्यातील करंजूल (सु) येथील बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम अगोदर केली गांधीगिरी, त्यातून बोध घेत ६ हजार केशर आंब्याची लागवड.

सुरगाण्यातील करंजूल (सु) येथील बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम 6 हजार केशर आंब्याची लागवड : A unique initiative of Bajrang Group at Karanjul in Surgana

ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींना सांगूनही व शासकीय अधिकाऱ्यांची विनवणी करून विकास साधला जात नव्हता. विरोधात आंदोलन करूनही गावच्या लोकांच्या अनेक वर्षापासूनच्या अडीअडचणी व विकासकामांचे प्रश्न सुटत नव्हते. गावातील खड्डे बुजवले जात नसल्याने मागील पावसाळ्यात झाडे लावत गांधीगिरी आंदोलन केले होते. त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, या गांधीगिरी आंदोलनामधूनच खरोखरच्या आंब्याची झाडे लावून निसर्ग संपदा जपावी असा विचार झाला. याबाबत शिकलेल्या युवक वर्गान लोकप्रतिनिधींना न सांगता अनेक बैठका घेतल्या.

यातून यावर्षी तीन पाड्यांवरील १६९ आदिवासी बांधवांच्या शेतात चक्क ६ हजार केशर आंब्याची रोपे लावण्यात आली. ही किमया घडली आहे सुरगाणा तालुक्यातील करंजूल (सु) या ग्रामपंचायतीमधील तीन पाड्यावर. सुरगाणा शहरापासून २० किलोमीटरवरील करंजूल (सु) या ग्रामपंचायतीमधील विजयनगर, वडमाळ या गावांमध्ये बजरंग ग्रुपमधील युवकांनी प्रत्येक महिन्याला पैसे गोळा केले.

गुजरातमधील वाजदा येथून केशर आंब्याची ६ हजार रोपे आगाऊ रक्कम भरल्याने कमी दरात विकत आणली. शेतकऱ्यांकडे किती क्षेत्र आहे याचे गणित जमवत कमीत कमी ३० तर जास्तीत जास्त १०० केशर आंब्याची रोपे आदिवासी शेतकऱ्यांना मोफत दिली. अगोदर खड्डे खोदा आणि लगेच रोपे घेऊन जा हे तत्व अंगीकारण्यात आले. शेतामध्ये आंब्याची झाडे लावल्यानंतर इतर भात, वरई, नागली, कडधान्याचे आंतरपीक घेता येईल अशा पद्धतीने या रोपांची लागवड करण्यात आली.

कधी काळी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडी असणाऱ्या व जंगलाचे माहेरघर असणाऱ्या सुरगाणा तालुक्यात सध्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. यामुळे निसर्गाची साखळी तुटून कधी दुष्काळाचे सावट तर कधी गारपीट या संकटांचा सामना करावा लागत आहे. आंबा लागवड केली तर निसर्ग संपदेचे जतन होऊन उत्पन्नही मिळेल हा उद्देश ठेवत युवकांनी हा ‘केशर आंबा लागवड’ प्रयोग केला आहे. यासाठी भारतीय लष्कराच्या सेवेत नेपाळच्या सीमेवर कार्यरत असलेले व वृक्षतोडीवर आंबा लागवड उपक्रम हाच पर्याय निसर्ग संपदेसाठी उपक्रम

A unique initiative of Bajrang Group at Karanjul in Surgana :

• सुरगाणा तालुक्यातील जंगल मोठ्या प्रमाणात नामशेष झाले आहे. यावर उपाय म्हणून केशर आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आदिवासी बांधवांना उत्पन्न मिळणार आहे. – मुरलीधर राठोड, अध्यक्ष, बजरंग ग्रुप

समाजहिताची कामे करता करता यापुढे समाजहिताची कामे करण्याचा उद्देश ठेवला आहे. खरोखरच्या ६ हजार केशर आंब्याची लागवड केली. अनिल लहरे, बजरंग ग्रुप उपाध्यक्ष बजरंग ग्रुपचे अध्यक्ष मुरलीधर राठोड, अनिल लहरे, दिलीप राठोड, गोविंद गावित, बबन पवार यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : 

Important Links : 

Related Notification Information Pdf : Click Here
Official Website Information Link :  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *