Aadhar Card Updates : आधार कार्ड नवीन अपडेट महत्त्वपूर्ण माहिती

आधार कार्ड नवीन अपडेट महत्त्वपूर्ण माहिती | आता आधारचे करावे लागेल नूतनीकरण. आधार कार्ड बद्दल जन जागृती.अति महत्त्वाचे.

Aadhar Card Updates:  Aadhar Card भारतीयांसाठी खूप महत्वाचे आहे.  Aadhar Card आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. Aadhar Card च्या उपयोग सरकारी योजनांपासून ते शाळा, महाविद्यालये इत्यादी सर्वत्र प्रवेशासाठी केला जातो. Aadhar Card बँक खाते उघडण्यापर्यंत, मालमत्ता खरेदी करण्यापासून ते प्रवासादरम्यान ओळखपत्रासाठी,  आयटीआर भरण्यापर्यंत सर्वत्र याचा वापर केला जातो. Aadhar Card च्या वाढत्या उपयुक्ततेचे कारण म्हणजे त्यात सर्व नागरिकांची Biometric माहिती नोंदवली जाते. जी इतर कोणत्याही ओळखपत्रात नोंदवली जात नाही. Aadhar Card च्या वाढत्या उपयुक्ततेमुळे ते अपडेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे.

आधार कार्ड ekyc करणे गरजेचे.

ज्या व्यक्तींनी 7 ते 10 वर्षा पूर्वी आधार काढलेले आहे.  म्हणजे अगदीच सुरवातीला जेव्हा आधार नोंदणी सुरू झाली तेव्हा, अश्याना आधार ekyc करणे गरजेचे आहे, अश्या व्यक्तींनी आपल्या नावाचा व पत्याचा पुरावा घेऊन आधार update करायचे आहे, अन्यथा आपले आधार inactive करण्यात येणार आहे.

सध्या बरेच आधारकार्ड बंद झाले आहेत बँकेत इतर ठिकाणी गेल्यावर सांगण्यात येते तुमचे आधारकार्ड बंद झाले आहेत नागरिकांना विनंती आहे आपले आधार नाव व पत्ताचे कागदपत्र देऊन अपडेट करून घ्या.

आपला आधारकार्ड तपशील अद्यतनित करा.

आपण अलीकडेच आपले नाव किंवा मोबाइल नंबर बदलला आहे? आपले मुल 5 किंवा 15 वर्षांचे झाले आहे का? आपण जवळच्या नावनोंदणी/अद्यतन केंद्रावर आपले आधारकार्ड तपशील (डेमोग्राफिक्स आणि बायोमेट्रिक्स) दुरुस्त/अद्यतनित करू शकता.

आपल्या ‘आधार’ मधील पत्ता अद्यतनित करा.

आपण नवीन शहरात गेले आहात?  किंवा आपण अलीकडेच आपला पत्ता बदलला आहे?  आपल्या बेसमध्ये आपला नवीन पत्ता अद्यतनित करण्यास विसरू नका. आपल्याकडे वैध पत्त्याचा पुरावा असल्यास किंवा आपल्याला पत्त्याचे कट्टरपंथीकरण पत्र प्राप्त झाले असेल (ज्याच्याकडे पत्त्याचा वैध पुरावा नाही), आपण आपला पत्ता अद्यतनित करू शकता.

‘आधार’अपडेट प्री-डिटेल करा.

आपण आपल्या ‘आधार’मध्ये केलेल्या अद्यतनांचे तपशील पाहू शकता.

Aadhar Card Updates:
Aadhar Card Updates:


आपले प्रश्न आणि त्यांचे उत्तर.

१) नेमकं ekyc का करायची? आमचे आधार चालू आहे तरी अपडेट करायचे का?

उत्तर हो – ज्या प्रमाणे बँक मध्ये जुने अकाउंट आहे ते बंद होत आहे, आपण व्यवहार करू शकत नाही, असे असल्यावर बँक कर्मचारी आपल्याला आधार कार्ड व पॅन कार्ड मागतात आणि त्या नंतरच आपण व्यवहार करू शकता, त्याच प्रमाणे आपण आधार कार्ड काढते वेळी कुठलेही कागदपत्र दिलेले नव्हते, ते आत्ता आपल्याला देणे आहे, आणि ते दिले तरच आधार कार्ड सुरू राहील.

२)मी मोबाईल नंबर लिंक केलेलं आहे, बायोमेट्रिक, जन्म तारीख, लिंग बदल केले आहे, किंवा यातील काही तरी update केलं आहे तरी मी आधार ekyc करायची का?

उत्तर- हो, आपण वरील पैकी काही गोष्टी update केल्या आहे, पण नाव आणि पत्ता update नाही केला त्या मुळे आधार ekyc करावी लागेलच. 

३) मी नावात बदल केला आहे, पण पत्ता बदल नाही केला तर आधार ekyc करावी लागेल का?

उत्तर- हो,  करावीच लागेल.

४) मी पत्ता बदल केला आहे, पण नावात बदल नाही केला तर आधार ekyc करावी लागेल का?

उत्तर- हो , करावीच लागेल.

५) आधार ekyc नाही केले तर काय होईल.

उत्तर- आपले आधार सलग्न सर्व कामे बंद होतील सरकारी योजना अनुदान बंद होतील.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *