Aam Aadmi Farmers Association meeting. |आम आदमी शेतकरी संघटनेचा मेळावा.

महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट सरपंच भास्कर रावजी पेरे पाटील.
आम आदमी शेतकरी संघटनेचा मेळावा.

भारत हा जरी एक शेतीप्रधान देश असला तरी देखील भारतात शेती व्यवसायाला (Farming) तोट्याचा व्यवसाय म्हणून संबोधले जाते. गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता देशातील शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असा ओरड करत असल्याचे चित्र आहे.

शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातिल सर्वाधिक शेतकरी आता कर्जबाजारी होत आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी बांधव आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय देखील घेत असतो.

महाराष्ट्रात हत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याने ही महाराष्ट्रासाठी एक चिंतेची बाब आहे.

शेतकरी बांधवांनो आता उठा जागे व्हा आपल्या हक्का साठी आणि आपल्या अधिकार प्राप्त करन्यासाठी.

13 सप्टेंबर 2022 रोजी केशरानंद मंगल कार्यालय, नगाव बारी रोड धुळे येथे आम आदमी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. त्या मेळाव्यास पक्षाचे निरीक्षक दीपक जी सिंगला तसेच राज्याचे निवडणूक प्रभारी नाईक साहेब महाराष्ट्र राज्याचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष रंगा जी राजुरे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक विजय जी कुंभार, तसेच महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट सरपंच भास्कर रावजी पेरे पाटील.

(1) शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे या मेळाव्याच्या अनुषंगाने आम आदमी शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. मागणी क्रमांक एक महाराष्ट्र राज्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना 75 हजार रुपये हेक्टरी भरपाई मिळावी.

(2)महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली असून महाराष्ट्र शासनाने पेरणी कापणी व नांगरणी खाते रब्बी व खरीप हंगामात खर्चात शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करावी.

(३)महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कर्जमाफी मिळून झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी वाढीव कर्ज पुरवठा करावा.

(४)अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ज्यांचे घरे कच्च्या मातीची आहेत त्यांना त्वरित घरकुल योजनेतून घरांचा लाभ मिळवून

(५)आत्महत्याग्रस्त अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाखाच्या ऐवजी पाच लाखाची आर्थिक मदत करावी.

(६)अल्पभूधारक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेची रक्कम सहा हजारावरून वार्षिक पंधरा हजार करावी.

(७)केरळ सरकार प्रमाणे महाराष्ट्रात फळे भाजीपाला कांदा व नाशवंत पिकास हमीभाव ठरवून द्यावा.

(८) रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आपल्या जीव गमवावा लागतो त्यामुळे शेतकरी बांधवांना दिवसा विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा.

(९)शेतकरी बांधवांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करून प्राथमिक असो माध्यमिक असो किंवा उच्च शिक्षण असो  मेडिकल इंजीनियरिंग सर्व शिक्षण  अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी कायदा करावा.

(१०)भारताची भौगोलिक परिस्थिती पाहता केंद्र सरकार जो हमीभाव जाहीर करते त्याच्याने अनेक राज्यातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ही नुकसान होते आहे त्याच्यामुळे राज्य सरकारच्याआखत्यारीत असलेल्या कृषी मूल्य आयोगाला राज्यातील शेतकऱ्यांचा हमीभाव उत्पादन खर्चाच्या नुसार 50% अधिकचा ठरविण्याचा अधिकार द्यावा.

(११)महाराष्ट्र राज्यात खते बियाणे व कीटकनाशके यांची तपासणी यंत्रणा अत्यंत कमी आहे त्यामुळे जिल्हा पातळीवर खाते बियाणे व कीटकनाशके तपासणीचा प्रयोगशाळा राज्य शासनाने त्वरित निर्माण करून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक व पिळवणूक त्वरित थांबवावी.

(१२)शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी पूरक उद्योगासाठी राज्य व केंद्र सरकारच्या विविध स्कीम मधून त्वरित कर्ज उपलब्ध करून देऊन बँकांमार्फत सिबिल स्कोर त्याच्यानंतरटन ओव्हर सारख्या अटी टाकल्या जातात त्या रद्द करून सरळ हाताने शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना कृषी पूरक उद्योगासाठी कर्ज द्यावे किंवा शेतकरी बांधवांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना प्रति महिना तीन हजार रुपये जोपर्यंत त्यांच्या हाताला काम मिळत नाही तोपर्यंत राज्य शासनाने द्यावेत.

(१३) मुख्य्मंत्री ग्राम सड़क योजना मार्फत मंजूर झालेले पानद रस्ते आज ही प्रलंबित आहेत त्या रस्तयाचे कामे त्वरित चालु करावे

 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता…

ठिकान:- केशरानंद मंगल कार्यालय, नगाव बारी रोड धुळे येथे आम आदमी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे.

*मोहन मनोरे अमळनेर*

*9763297407*

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *