Aamdar Ma. Rajesh Padvi |
शहादा-तळोदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.राजेश पाडवी साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जाम ग्रामपंचायत येथील मेन रोड ते शेताकड़े जाणारा 2 किलोमीटर शेत शिवार रस्ता आपल्या स्थानिक विकास निधीतून काम परिपूर्ण.
शेताकडे जाणारा शेतशिवार रस्ता बरेच वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत होता पावसाळ्याच्या दरम्यान शेतकऱ्यांना येणे जाणे त्रासदायी झाले होते.
बैलगाडी/दुचाकी येणे जाणे शक्य होत नव्हते अतिशय 1 किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना खते बियाणे अवजारे खांद्यावर घेऊन जावे लागत होते.
अशा अवस्थेत गावकऱ्यांनी मला कळवताच मी मा.जिल्हा परिषद सदस्य सुनिल दादा चव्हाण यांना कळविले व त्यांनी आमदार राजेश पाडवी साहेबांना फोन केला व प्रतक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांच्या बद्दल अडचणी देत प्रस्ताव/ग्रामपंचायत ठराव दिले व तातडीने त्या कामाची दखल घेऊन आमदार साहेबांनी लगेच मंजुरी देऊन शेतशिवार रस्ता करून दिले.
शिवार रस्ता करून दिल्याबद्दल माननीय आमदार राजेश पाडवी साहेबांचे जाम ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.