उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj

उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj

Adivasi Pawara Samaj  : उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज ! यांच्याविषयी अधिक लेख वाचा :

उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj

Adivasi Pawara Samaj : उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj हा उत्तर महाराष्ट्र,मध्य प्रदेश व गुजरात यांच्या सीमाभागात राहणारा समाज आहे. आदिवासी समाजतील लोक सातपुड्याच्या खासकरून, धुळे ,नंदुरबार जिल्ह्यात पायथ्याकडील प्रदेशांत राहतात. महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश ह्या राज्यांत पावरा समाज विखुरलेला असून तेथील भौगोलिक परिसर, पर्यावरण व आजूबाजूला असणाऱ्या इतर समाजासोबतचे सानिध्य ह्यामुळे त्यांच्यात काही प्रमाणात विविधता आहे .

पावरा जमातीचे लोक मध्यम बांध्याचे, किंचित सावळ्या रंगाचे व स्वभावाने लाजरे . Adivasi Pawara Samaj

पावरा जमातीची पावरी ही मुख्य बोलीभाषा असून तिच्यात स्थानपरत्वे व आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांचा प्रभाव पडलेला आढळतो. नंदुरबार जिल्ह्यातील उत्तरेला असलेल्या नर्मदेच्या काठावर असणाऱ्या पावरांना नोंददळया, अक्राणी (धडगांव) तालुक्यातील डोंगराळ भागात राहणाऱ्यांना भारवट्या, शहादा, तळोदा तालुके, तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका ह्या सपाट पट्ट्यात राहणाऱ्यांना देहवाल्या, मध्यप्रदेश व महाराष्ट्र सीमेवर निंबाळ्या, राठवा, बारेला व पाल्या म्हणतात. या सर्वांच्या बोलीभाषांत, पेहरावात काही प्रमाणात विविधता दिसून येते.

उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी समाज पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj

पावरा जमातीच्या पुरुषांपैकी काही जुने लोक अजूनही कमरेला फक्त लंगोट लावतात व त्यावर धोतराने कंबर बांधून वर सदरा, बंडी घालतात. शिकलेले तरुण आता शर्ट-पॅंट वापरायला लागले आहेत. जुन्या स्त्रिया नाटी (लुगडे) नेसतात तर आताचे स्त्रीया साडी परिधान करू लागल्या आहेत. त्या वाक्या, बाट्ट्या, आहडी, हाकूल, पैंजण, पिंदणा असे चांदीचे पारंपरिक दागिने घालतात.

Adivasi Pawara Samaj आदिवासी जमातीत विविध सण उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी होळी ह्या सणाला खूप महत्त्व दिले जाते. होळी सणाला जे बावा बुद्या बनतात ते पाच दिवस उपवास पाळून खाटेवर न झोपता जमिनीवर झोपतात. सर्वांगावर राखेने नक्षी काढतात. डोक्यावर मोरपिसाचा अथवा बांबूपासून बनवलेला टोप घालतात. कमरेला मोठे घुंगरु किंवा सुकलेले दोडके बांधतात. होळी अगोदर बोंगऱ्या, मेलादा इ. उत्सव साजरे केले जातात.

होळीशिवाय इतर सणही साजरे केले जातात . त्यात नवाई, बाबदेव, वाघदेव, हिंवदेव, अस्तंबा महाराज, राणी काजल, इंदल इ. देवांच्या पूजा होतात.

Adivasi Pawara Samaj समाजात लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने होतो. साधारणत: तीन दिवसाचा हा सोहळा असतो. पावरा समाज अजूनही बराचसा मातृसत्ताक असल्याने स्त्रियांना आदराचे स्थान असते. विवाहात नवरा मुलगा मुलीच्या घरच्यांना हुंडा (देजो) देतो. ही रक्कम समाजाने संबंधितांचीआर्थिक स्थिती पाहून समाजातील वरीष्ठ लोकांनी ठरवुन दिलेली असते. त्याच्यापेक्षा जास्त रक्कम वधुपित्याला घेता येत नाही. हुंडा वरपक्ष वधूला देत असल्याने हुंडा बळी अथवा स्त्रीभ्रूण हत्या असले प्रकार पावरा जमातीत होत नाहीत. लग्न असो वा पारंपरिक कोणताही उत्सव असो, त्यात मोहाच्या फुलांपासून बनवलेले मद्य पूजेसाठी व पाहुण्यांना पेय म्हुणून मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

Adivasi Pawara Samaj आजही आपली सांस्कृतिक विविधता, पारंपरिक सण उत्सव, आपली भाषा, रुढी व परंपरा टिकवून आहे. काही प्रथा चांगल्या, काही वाईटही आहेत. डाकीण, बालविवाह, अंधश्रद्धा ह्या समाजात आजही असलेल्या वाईट प्रथा आहेत. आता समाजातील सुशिक्षित लोक लोकचळवळीतून ह्या अनिष्ट प्रथंविरोधात प्रबोधन करुन लोकजागृती करत आहेत. मुलांमधील कुपोषण व बालमृत्यू हे ह्या समाजासाठी शापच ठरले आहेत. आता विविध शासकीय आरोग्यसेवा व काही स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने त्यावर मात करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. होळीच्या अगोदर १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजा करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बुद्या, वन्य प्राणी, चेटकीण वा काली इत्यादींचा समावेश असतो.एका संघात जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अशा नाचात सहभाग घेतात.

खालील माहिती देखील वाचा :

Adivasi Pawara Samaj कहाणी

गेर नृत्य:- होळीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गेर नृत्यासाठी पावरा लोक ख्यातनाम आहेत. या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात.

राय: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. त्यांचा पेहरावात दोन ९ वारी साड्यांचे केलेले उपरणे असते. कंबरेखाली एक साडी गोलाकार गुंडाळलेली असते. नर्तकांच्या हातात तलवार व डोक्यावर रंगीत पागोटे असते. यांच्या सोबत साडी नेसलेले स्त्री वेषातील पुरुष असतात. या सर्वांना गेर नृत्यातील शिस्त चोखपणे पाळावी लागते. हत्यारबंद असलेल्या रायांचे गेरनृत्य पाहण्यास मनमोहक असते.

बावा बूद्या: हे गेर नृत्यातील नर्तक असतात. यांचा पेहराव आकर्षक असतो. डोक्यावर बांबूपासून तयार केलेला टोप असतो. अंगावर पांढर्‍या रंगाने नक्षी वा रेषा काढलेल्या असतात. गळ्यात माळा असतात. कंबरेभोवती दूधीभोपळ्याची फळे बांधलेली असतात. हातात तलवार वा लाकडी बांबूची काठी असते. व कंबरेला व पायात घुंगरू बांधलेले असतात. हे घुंगरांच्या ठेक्यावर किंवा ढोलाच्या ठेक्यावर नाचतात. एका तालात नाचणे व घुंगरांचा आवाज यावर या बावाबुद्धयांचे नृत्य पाहण्यासारखे असते.

वन्यप्राणी: वेषात अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात.

चेटकीण वा काली:* प्रत्येक संघात एक चेटकीण असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पळी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते.

खालील माहिती वाचा :

वरील माहिती वरिष्ठांच्या माहितीवरून संकलित केली आहे. तरी माहितीत काही दुरूस्ती असल्यास कळवावे. संकलन:- शैलेश लालसिंग पावरा ( न्यू बोराडी, ता. शिरपूर  जि. धुळे ) आपला समाज आपला अभिमान

उत्तर महाराष्ट्रातील एक आदिवासी पावरा (जात) समाज Adivasi Pawara Samaj

Read More : 

अशाच नवनवीन माहिती साठी : शासकीय योजना : माहिती अधिकार : ग्रामपंचायत चे माहिती : साठी आमच्या सोसिअल मेडिया ला जॉईन व्हा : आम्ही दररोज नवीन माहिती शेअर करत असतो. Adivasi Pawara Samaj

Related Notification Information Pdf : Adivasi Pawara Samaj Click Here
Official Website Information Link : Adivasi Pawara Samaj  Click Here
Join Us On Facebook  Click Here
Join Us On Telegram  Click Here
Join Us On WhatsApp  Click Here
Join Us On Instagram  Click Here

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !