advocate. Seema Valvi, | पारंपारीक पेरावातील जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेधले लक्ष.

पारंपारीक पेरावातील जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेधले लक्ष.

तळोदा : ता.०९ जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनानिमित्त आज तळोदा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा एड,सीमा वळवी यांनी पारंपारिक आदिवासी पेहराव करत सहभाग घेतला पारंपारिक पेरावातील जिल्हा परिषद अध्यक्षांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सीमा वळवी

पारंपारीक पेरावातील जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेधले लक्ष.
पारंपारीक पेरावातील जिल्हा परिषद अध्यक्षांनी वेधले लक्ष.

यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते.पारंपारिक आदिवसी नृत्य देखील त्यांनी उत्साह पूर्ण सहभाग घेतलेला दिसून आला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कॉलेज रस्त्यावरील रिद्धी सिद्धी गणेश मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीत सभापती यशवंत ठाकरे, नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, सुभाष चौधरी, पंकज राणे, अर्जुन वळवी, तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, निशा वळवी, योगिनी वळवी, सरपंच मंगलसिंग वळवी, हिरालाल पाडवी, प्रकाश ठाकरे, अनिल माळी सतीवन पाडवी, सतीश वळवी आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…   

जल, जंगल, जमीन यांच्या सानिध्यात राहून वास्तल्य करणाऱ्या, मुळनिवासी म्हणुन जगभर आपली कला-संस्कृती, भाषा, चालीरीती, वेशभुषा यांची जोपासना करणारा  आदिवासी संस्कृतीचे दर्शन मिरवणुकीतून दिसले.

आदिवासी समाजातील अनेक तरुणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. ढोल नृत्य, पारंपरिक वाद्य वादनासह सादर झाले. त्यावर ठेका धरणारे पारंपांरीक वेशभूषेतील तरुण तरुणींची गट तालुक्यातील विविध गावातून तालबध्द आणि मनमोहक कला अविष्कारांचे मनमोहक सादरीकरण करीत होते

जंगल दिलं है तो उसकी धडकन आदिवासीं है! ‘जय आदिवासी’, बिरसा मुंडा की जय’ अश्या प्रकारचे जनजागृती करणारे फलक यावेळी मिरवणुकीत दिसून आले.

मिरवणूक स्मारक चौक मार्गे बिरसा मुंडा चौकात काढण्यात आली. स्मारक चौकात जिप अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी,  सभापती यशवंत ठाकरे, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, राजेंद्र गावित, संजय माळी, माजी प.स.सभापती आकाश वळवी, यांच्या सह आलेले मान्यवरांनी मिवणुकीत ठेका घेतला.. बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांचे प्रतिमेवर माल्यार्पण करून मिरवणुकीची सांगता झाली…  

मिरवणूकीत ट्रॅक्टरवर बिरसा मुंडा तंट्या मामा भिल या आदिवासी क्रांतिकारकांचे वेशभूषा परिधान करून तरुणांनी आदिवासी समाजातून बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण यावेळी करून दिले….

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *