क्रांति सुर्य धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरा.

दि. 15 नोव्हेंबर, 2024 रोजी ओरपा (सोराबारा), ता. अक्कलकुवा येथे क्रांति सुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आदिवासी कर्मचारी मंच, जमाना ऐरिया मार्फत (वष॔- दुसरे) आयोजित करण्यात आले. ( Bhagwan Birsa Munda’s 150th birth anniversary celebrated with enthusiasm)

जयंतीच्या प्रतिमापुजन कार्यक्रमास अविनाश वसावे (सरपंच- उमरागव्हाण ग्रा.पं.), यांच्या मार्फत केले. ह्यावेळी सरपंच अविनाश वसावेयांनी भगवान बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्य बद्दल गावकर्यांना माहिती दिली..

तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की तुम्ही सर्व संस्कृतींच्या सौंदर्याबद्दल आणि त्यांच्या सामर्थ्याबद्दल, विशेषत: ज्या संस्कृतीसाठी आपण अभिमानास्पद वारसदार आणि संरक्षक आहात त्याबद्दल जागरूक रहा. आपल्या समाजाला तसेच इतर जगाला आपली संस्कृतीचा तितकाच अभिमान वाटावा यासाठी आपल्याला प्रयत्नांना पंख देण्याचे आणखी प्रसंग येतील.

  • आपल्या आधुनिक जगाच्या सांस्कृतिक आणि नैतिक
  •  राष्ट्राची संस्कृती ही ईथल्या लोकांच्या हृदयात आणि आत्म्यात वसलेली आहे
  •  आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशात आपले राष्ट्र निर्माण करण्यात मदत करण्याची प्रगल्भ शक्ती आहे. उलगुलान जिंदाबाद

ज्या वयात सामान्य व्यक्ती स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ घालवते. त्या वयात हा महापुरुष समाजासाठी आणि देशासाठी एक विद्वान माणूस म्हणून वावरत असतानाच, कसे जगावे आणि कसे मरावे याचा संदेश भावी पिढ्यांसाठी देऊन जातो. दुसरी व्यक्ती शुद्धीवर येण्याआधीच महापुरुषाचे म्हणणे अंमलात आणते.

भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती उत्साहात साजरा | Bhagwan Birsa Munda's 150th birth anniversary celebrated with enthusiasm
| Bhagwan Birsa Munda’s 150th birth anniversary celebrated with enthusiasm

आयुष्य किती मोठे आहे हे महत्त्वाचे नाही तर आयुष्य किती महान आहे. धन्य हे मातीचे सुपुत्र ज्यांनी लोकांना स्वतःला समजून घेऊन अज्ञानाशी लढायला शिकवले. आणि अवघ्या 25 वर्षात तो इतिहासाचा माणूस बनला. धन्य ती माती जिथे या शूर माणसाचा जन्म झाला, धन्य ती माणसे ज्यांच्या कल्याणासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. अशा महापुरुषाला जोहार अभिवादन..! करत आपले भाषण संपविले.

क्रांति सुर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती साजरा करण्यासाठी उपस्थित होते, गावाचे अशोक वसावे (उपसरपंच- उमरागव्हाण ग्रा. पं.) बुलाखी वसावे (माजी पोलीस पाटील), हिरालाल वळवी (से.नि. मुख्याध्यापक- आश्रमशाळा),

मुंगल्या वळवी (मुख्याध्यापक- जि.प. उमरागव्हाण), जयसिंग वळवी, मोगा वळवी, अॅड. महेश वसावे, पिसा वळवी (अध्यक्ष- बिरसा मुंडा अॅथलेटीक्स क्लब) सुरूपसिंग वसावे, रविंद्र वसावे, इंद्रसिंग वळवी, लोकेश वळवी, ईश्वर वळवी, बिरसा मुंडा अॅथलॅटीक्स क्लबचे

विद्यार्थी-विद्यार्थीनीं- अमित वसावे, अतुल वसावे, रोहित वळवी, राहुल वळवी, दिपक वळवी, बादल वसावे, रविता वसावे, पल्लवी वळवी, अपुर्वा वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जमाना ऐरियातील अधिकारी-कर्मचारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

हेही वाचा :

Bhagwan Birsa Munda’s 150th birth anniversary celebrated with enthusiasm

Birsa Munda History In Marathi | बिरसा मुंडा यांचा इतिहास वाचा.

Leave a Comment

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !